मनुष्यबळ, वाहनांचा प्रश्न लवकरच सोडविणार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

नवीन पोलीस ठाणे, आयुक्तालय झाल्यानंतर अनेक समस्या असतात हे खरं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया संदर्भात यापूर्वी जागा, वाहने, मनुष्यबळ या विषयी मीटिंग झाल्या आहेत. त्यासाठी मोठा पाठपुरावा होणे गरजचे आहे. नवीन आयुक्तालयातील समस्या सोडविण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असून येणाऱ्या काही महिन्यात हे प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीष बापट यांनी बुधवारी चिखली येथे दिले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8cc8918b-cc98-11e8-84d0-8def411d56ee’]

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाण्याचे आज पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, पोलीस आयुक्त आर.के. पद्मानाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, चिखलीचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, शंकर अवताडे (गुन्हे) यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

[amazon_link asins=’B07BHFT3VQ,B06ZZB71TB,B07DNS1TMZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f0dff54-cc98-11e8-ae40-a917718ce5c4′]

बापट पुढे म्हणाले, पोलिसांनी नागरिकांशी सवांद साधायला हवा, गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याची तयारी ठेवायला पाहिजे, तसेच नागरिकांमध्ये पोलिसांविषयी भितीचे वातावरण नसायला हवे. नागरिकांनी काही न होता पोलिसांकडे जावे, चांगला संपर्क तयार होईल, पोलिसांविषयी विश्वास निर्माण होईल.

एकच गुन्हेगार असतो तो अनेक गुन्हे करतो त्यामुळे अशी प्रवृत्ती संपवण्यासाठी प्रयत्न करावेत
राज्य सरकार पोलिसांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे.  चौकीत गेली की भानगड असते असे चित्र सध्या नाही त्यामुळे समाजातील ही प्रतिमा बदलायला हवी. चांगल्या कामासाठी पोलिस मदत करतात त्यामुळे त्याना मदत करा, असेही आवाहन केले.
महापौर राहुल जाधव म्हणाले, पोलीस आणि महापालिका यांच्यात समन्वय ठेवायला पाहिजे. आयुक्तलयास जाणवत असलेल्या सर्व अडीअडचणी पालिकेच्या माध्यमातून दूर करू मात्र शहरातील नागरिकामांध्ये सुरक्षीत असल्याची भावना निर्माण व्हायला हवी एवढीच मागणी आहे.

आत्मदहनाच्या इशार्‍याने विद्यापीठ प्रशासनाला जाग

पोलीस आयुक्त आर.के. पद्मानाभन म्हणाले, पालिका आणि पोलीस यांच्यात फार फरक आहे. कमी मनुष्यबळ मध्ये जास्तीत जास्त काम करणार असून ते बोलून नाही तर करून दाखवणार आहे.
पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाही असे होणार नाही यासाठी प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी फोन करा पोलीस तुमच्याकडे पोहचतील.
शहरात गुन्हे वाढले नाहीत तर पूर्वी दाखल होत नसल्याचे गुन्हे उघड करून ते दाखल करत आहोत त्यामुळे गुन्हे वाढल्याचे दिसत आहे.