…अन्यथा पुन्हा खळ्ळखट्याक : राज ठाकरे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनधिकृत फेरीवाला धोरणाची आणि त्यांच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, अन्यथा मनसेला पुन्हा आंदोलन करावे लागेल. असा धमकीदार  इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिला आहे.

वाळू माफीयांची नविन शक्कल… पावती एक आणि फेऱ्या डबल

याबाबत अधिक माहिती अशी की, एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले होते. हे आंदोलन  मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी  करण्यात आले होते. अनेक ठिकाणी या आंदोलनामुळे सुधारणा झाली मात्र पहिले पाढे पंचावन्न या म्हणी प्रमाणे सगळे जश्यास तसे झाले आहे.  मुंबई महापालिकेने सध्या दहा हजार फेरीवाल्यांच्या जागा फेरीवाला क्षेत्र धोरणाखाली निश्चित केल्या आहेत. सहा वॉर्डमध्ये विभागलेल्या या जागांवर अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी परवान्यासोबतच अधिवास प्रमाणपत्र  देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अधिवास प्रमाणपत्र सादर करण्यास अनेक फेरीवाला संघटनां विरोध करत आहेत.

विशेष म्हणजे  काँग्रेसच्या फेरीवाला संघटनेतर्फे  याला विरोध केला जात आहे. मात्र, नियमानुसार अधिवास प्रमाणपत्र असलेल्या फेरीवाल्यालाच जागा द्या, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा नाहीतर मनसेला आपल्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, असा धमकीदार  इशारा राज ठाकरेंनी   महापालिका आयुक्तांना दिला आहे.

जाहीरात