असा सापडला मॉडेल मानसी दीक्षितचा मारेकरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मालाड परिसरामध्ये सोमवारी झालेल्या मॉडेल मानसी दीक्षितच्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. पण काही तासांतच तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी मुझम्मिल हसनच्या मुसक्या आवळल्या. ओला टॅक्सीचालकाच्या तत्परतेमुळे पोलिसांना मानसीच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचण्यात यश आले. मात्र, मानसी दीक्षितचा खुन का करण्यात आला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’96dd05dc-d1d0-11e8-9309-93535e9fdb19′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी आणि मुझम्मिलमध्ये कोणत्यातरी कारणांमुळे वाद झाला. या वादादरम्यान मुझम्मिलने लाकडी टेबलावर तिचे डोके जोरात आपटले. यातच मानसीचा मृत्यू झाला. यानंतर मुझम्मिलनं तिचा मृतदेह बॅगमध्ये कोंबला,ओला बुक केली आणि चालकाला एअरपोर्टच्या दिशेने गाडी नेण्यास सांगितली. मध्येच त्याने चालकाला मालाडमध्ये गाडी थांबवण्यास सांगितली. गाडी थांबल्यानंतर त्याने झाडाझुडपात बॅग फेकली.

[amazon_link asins=’B01KV4YK5A’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’afbd469d-d1d0-11e8-9209-d335b8fbbed4′]

त्यानंतर रिक्षा करुन तो कोठेतरी भलतीकडेच गेला. त्याच्या हालचालींवरुन ओला ड्रायव्हरला संशय आला, त्याने तातडीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी टॅक्सीचालकाकडून मुझम्मिलचा फोन नंबर घेतला. मोबाइल कंपनीकडून मागवण्यात आलेल्या तपशिलामध्ये मुझम्मिल हसनची माहिती प्राप्त झाली. यानंतर त्याचे लोकेशन शोधून केवळ चार तासांत पोलिसांनी त्याला गजाआड केले.

एका दिवसात स्वाइन फ्लूने घेतले ३ बळी

टॅक्सीचालकाने  पोलिसांना सांगितले की, ज्यावेळेस बॅग उचलण्यास मुझम्मिला मदत केली, त्यावेळेस संशय निर्माण झाला. बॅगमध्ये प्रमाणाबाहेर वजन असल्याचे जाणवत होते. अंधेरी (पश्चिम) येथील अल-ओहद इमारतीतून मुझम्मिलने ओला बुक केली होती. जिथे मानसीची हत्या करण्यात आली होती. मुझम्मिलने ओला अ‍ॅपद्वारे जवळपास तीन वेळा ठिकाण बदलले़ यानंतर दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास माईंडस्पेस मालाडकडे गाडी नेण्यास सांगितली आणि तिथे तिचा मृतदेह फेकला. दरम्यान, मानसीची हत्या का करण्यात आली, यामागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

जाहिरात