‘सेल्फी’वरून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना अभिनेत्री मानसी नाईकचा टोला (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाण्यासाठी सरकारकडे भिक मागण्याची वेळ यावी, यापेक्षा कोणतेच दुर्दैवी गोष्ट नाही. मात्र काही लोक सेल्फी काढण्यात, सोशल मीडियावर संदेश देण्यात व्यस्त असल्याने नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होतेय, असा टोला मराठी सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांनी आज जलसपदामंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे.

नाईक या अहमदनगर येथे दीपाली सय्यद यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या. श्रीगोंदा-पारनेर तालुक्यातील ३५ गावांसाठी साकळाई जलसिंचन योजना सुरू करावी, या मागणीसाठी दीपाली सय्यद आमरण उपोषणाला बसल्या आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून सरकारने अद्यापही या उपोषणाची दाखल घेतलेली नाही. मानसी नाईक यांच्यासह अभिनेत्री माधुरी पवार, सीमा कदम, श्वेता परदेशी, सायली पराडकर या अभिनेत्री दीपाली सय्यद यांना पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या.

दीपाली सय्यद व मानसी नाईक या खूप जवळच्या मैत्रिणी असून, उपोषणस्थळी दाखल होताच सय्यद यांची परिस्थिती पाहून मानसी भावुक झाली होती. थेट दीपालीच्या गळ्यात पडून मानसी नाईक हिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

आरोग्यविषयक वृत्त