होय, मानसी नाईकचा नवरा प्रदीप खरेरानं तिला केलं ‘हे’ प्रॉमिस

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) नुकतीच बॉयफ्रेंड इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरा (Pardeep Kharera) याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर ती प्रदीप खरेराच्या गावी फरीदाबादला गेली होती. दोघेही नुकतेच मुंबईत परतले आहेत. दरम्यान आता प्रदीपने मानसीसोबतचे फोटो शेअर करत तिला वचन दिले आहे. त्याच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून पाहणारे प्रत्येक जण म्हणत आहेत नवरा असावा तर असा.

https://www.instagram.com/p/CKk_fYVLeMX/?utm_source=ig_embed

प्रदीप खरेराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने मानसी सोबतचे लग्नातील फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहले आहे की, मी तुला वचन देतो की खळीपासून सुरकुत्यांपर्यंत मी नेहमीच तुझ्यासोबत असणार आहे. त्याच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CKh0NCtLMkP/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/CKlD3gJgiju/?utm_source=ig_embed

मानसीचा नवरा प्रदीप खरेरा आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. तो सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असून त्याला पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत. तर मानसी ही उत्तम नृत्यांगणा असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.