हवामान खात्याचा अंदाज : मान्सून ३ दिवसांत कोकण, गोव्यात तर ‘या’ तारखेपर्यंत राज्यभरात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बळीराजा शेतकर्‍यांसह राज्यातील सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या ३ दिवसांत गोव्यात आणि कोकणात जोरदार पाऊस पडेल तर २४ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यभर पोहचणार आहे. उद्या (दि.१८ जून) कोणणात मुसळधार तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

वायू चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होत आहे. त्यामुळेच नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांचा प्रवास वेगात होत आहे. कर्नाटकामध्ये धडकलेले मोसमी मारे आता राज्यात पोहचण्यास सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांच्या प्रवासात कुठलाही अडसर आला नाही तर आगामी २ ते ३ दिवसात त्याचे राज्यात आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदा कमालीचा उन्हाळा जाणवला.

मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही उष्ण वातावरण आहे तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. मोजक्या काही ठिकाणी पुर्वमोसमी पाऊस पडत असला तरी त्याचा मोठा फायदा होणार नाही. त्यामुळे बळीराजा शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्र पावसाची मोठया अतुरतेने वाट पहात आहे. मोसमी पावसासमोर यंदा खुप अडचणी निर्माण झाल्या आहेत.

१८ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर मोसमी वारे १ जूनला केरळमध्ये पोहचणे अपेक्षित होते. मात्र, त्यास आठवडाभर उशिर झाला. पुन्हा चांगला प्रवास सुरू झाल्यानंतर चक्रीवादळ वायुमुळे अडथळा निर्माण झाला. चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने १३ ते १४ जून रोजी अपेक्षित असलेल्या मोसमी वार्‍यांचा प्रतिक्षा पुन्हा वाढली.

चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने येत्या ३ दिवसांत मान्सून कोकण आणि गोव्यात तर २४ जून पर्यंत संपूर्ण राज्यात पोहचेल अशी दाट शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

आहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

आरोग्यासाठी मुलांना द्यावे ‘एग सलाद’, होतील ‘हे’ फायदे

You might also like