Monsoon Food | पावसाळ्यात नुकसानकारक ठरू शकतात खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टी, चुकूनही खाऊ नका; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पावसाळा आपल्या सोबत अनेक आजार घेऊन येतो. या काळात लोक सर्दी, ताप, खोकला इत्यादी आजारांनी त्रस्त होतात. डॉक्टरांनुसार, पावसाळ्यात खाण्या-पिण्याची (Monsoon Food) काळजी घेतली पाहिजे. या हंगामात खाण्याच्या काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. पावसाळ्यात कोणत्या गोष्टी खाऊ (Monsoon Food) नयेत, ते जाणून घेवूयात.

पावसाळ्यात हे खाणे टाळा (Avoid eating this food in rainy season)

1. पालक किंवा चाकवत – Palak or Chakwat
पावसाळ्यात पालक, मेथी, चाकवत, वांगी, कोबी, फ्लॉवरसारख्या भाज्या खाणे टाळले पाहिजे. कारण यामुळे पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि फंगस इन्फेक्शनचा धोका खुप वाढतो. पालेभाज्यांमध्ये किडे वेगाने वाढतात. यामुळे पोट खराब होऊ शकते.

2. मशरूम – Mushrooms
डॉक्टर सांगतात की, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळावे. थेट जमीनीतून उगवणार्‍या मशरूरमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो.

3. दही – Yogurt
पावसाळ्यात डेयरी प्रोडक्टचे नियमित सेवन टाळावे. कारण या काळात खाण्या-पिण्याच्या अशा वस्तूंमध्ये बॅक्टेरिया होऊ शकतात, जे मान्सूनमध्ये जास्त वाढतात. यामुळे पोटाच्या समस्या होऊ शकतात. दह्यात सुद्धा बॅक्टेरिया असतात, त्याचे कमी सेवन करावे.

 

4. फिश – Fish

मान्सून काळात मासे किंवा समुद्र जीवांच्या प्रजननाचा काळ असतो. याच कारणामुळे मासे खाल्ल्याने फूड पॉयजनिंगचा धोका वाढतो. याशिवाय पावसाळ्यात पाणी प्रदूषित असल्याने माशांवर घाण साचते. असे मासे सेवन केल्याने नुकसान होते.

5. रेड मीट – Red Meat
पावसाळ्यात पचनक्रिया कमजोर होते, यासाठी चरबीयुक्त रेडमीट सारखे जड अन्न पचने अवघड जाते. यासाठी नॉनव्हेज खाणे टाळा.

6. सलाड – Salad
सलाड सुद्धा पावसाळ्यात खाऊ नये. पावसाळ्यात कोणतीही वस्तू कच्ची खाणे टाळले पाहिजे. कापलेली फळे आणि भाज्यांचे सेवन करू नका.

7. तळलेले-भाजलेले पदार्थ – Fried, baked food
पावसाळ्यात तळलेले-भाजलेले पदार्थ खाऊ नका. यामुळे पित्त वाढते. शिवाय या काळात डायजेशन स्लो असते.

8. स्ट्रीट फूड – Street Food
मान्सूनच्या काळात अनेक जलजन्य आजार होतात. यामध्ये डेंग्यू आणि वायरल सारखे आजार वेगाने संक्रमित करतात. डॉक्टरांनुसार, पावसाळ्याच्या काळात कधीही उघड्यावर ठेवलेले पदार्थ किंवा फळे सेवन करू नये, यामुळे नुकसान होते. यासाठी बाहेर मिळणारे स्ट्रीट फूड टाळले पाहिजे.

Web Titel :- Mansoon Food | monsoon food diet 8 foods you should never eat in rainy season

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

OMG! गायीने कुत्र्याचे तोंड असलेल्या वासराला दिला जन्म, मग लोक ‘या’ कारणामुळे अर्पण करू लागले ‘नैवेद्य’

Corona Vaccine | 20 % लोकांमध्ये अँन्टीबॉडी बनली नाही, बूस्टर डोसला ग्रीन सिग्नल?

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3,623 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी