Monsoon Update | पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Monsoon Update | मागील तीन-चार दिवसांत पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस (Rain) पडेल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा (Heavy rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

या जिल्ह्यांना रेड अलर्ट

आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या धरण क्षेत्रात पुढील तीने ते चार दिवस चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सलग तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील (Pune district) अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. आज घाट परिसरातील पुण्यासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीनं विजांचा गडगडाट होणार आहे.

पुढील 3 तासात या जिल्ह्यात मुसळधार

हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, पुढील तीन तासांत पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नंदूरबार आणी बीड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Web Title : Mansoon Update | monsoon covers entire country red alert by imd to satara kolhapur and pune

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | पुणे जिल्हयात सुमारे 10000 अपार्टमेंट ! आता क्षेत्रफळानुसार अपार्टमेंटधारकांना द्यावा लागणार मेंटेनन्स, जाणून घ्या

Pimpri Crime News | आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बिल्डर मेहतासह 7 जणांवर गुन्हा दाखल; पार्किंगसाठी सोय करुन देतो सांगून केली होती फसवणूक

Pune Crime News | लग्नाच्या आमिषाने तरूणीसोबत केली ‘मज्जा’ अन् दुसरीसोबत केला विवाह, तरूणावर बलात्काराचा FIR