Monsoon Update Today | राज्यात 4 दिवस मुसळधार पाऊस, कोकणात अतिवृष्टी?

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Monsoon Update Today | जून मिहिन्याच्या सुरुवातीला जोरदार बसरलेल्या मान्सूने (Monsoon) मध्यंतरी दडी मारली होती. मात्र मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यात पुढील चार दिवसांत मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण तयार झाले आहे. आज (गुरुवार) राज्यातील काही भागात तुरळक तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. शुक्रवारी (दि.9) कोकणात मुसळधार पाऊस पडणार असून कोकणाला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. Mansoon Update Today | in next four day rain in maharashtra

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हवामान खात्याने सिंधुदुर्गमध्ये अतिवष्टी होईल असा इशारा दिला आहे. तर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. मागिल दोन दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी पाऊस पडत आहेत. राज्यातील हवामानात बदल झाल्याने अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आल्याने उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे.

या ठिकाणी उष्णतेत कमालीची वाढ

राज्यातील पुणे, महाबळेश्वर, सातारा, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ येथे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान 24 ते 39 अंश सेल्सिअस, कोकणात 32 ते 33, मराठवाड्यात 34 ते 35 तर विदर्भात 35 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.

मान्सूनसाठी पोषक स्थिती

उत्तर भारतात मान्सूनचा प्रवास सुरु होणार आहे. मान्सूला पुढे सरकण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. शनिवार (दि.10) पासून मान्सूनचा वायव्य भारतातील प्रवास सुरु होणार असून दिल्ली, पंजाप, हरियाना, राजस्थानच्या काही भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तवली आहे.

 

या ठिकाणी होणार जोरदार पाऊस

गुरुवार – नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, संपूर्ण मराठवाडा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर

शुक्रवार – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ

शनिवार – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, पालघर, सातारा, नांदेड, वाशीम, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर

रविवार – संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बुलडाणा, वाशीम, अकोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर

या ठिकाणी पावसाच्या सरी

राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे राज्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. बुधवारी राज्यातील मुंबई, कुलाबा, सांताक्रूझ, रायगड, माणगाव, श्रीवर्धन, धुळे, सांगील, मिरज सातारा येथे हलका पाऊस पडला. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी तुरळक सरी बरसल्या.

Web Title : Mansoon Update Today | in next four day rain in maharashtra

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra political News | मुंबई, कोकणमध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेनेला शह देण्याची भाजपची रणनीती

Jammu And Kashmir । जम्मू कश्मीरमध्ये अवघ्या 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; ‘हिजबुल’च्या टॉपच्या कमांडरलाही कंठस्नान

Modi Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता भाजप संघटनेतही होणार बदल; प्रकाश जावडेकर, ‘या’ दिग्गजांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी