Mansukh Hiran Murder Case | NIA चा खळबळजनक दावा ! हिरेन यांच्या हत्येसाठी 45 लाख दिले, हत्येनंतर मारेकरी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiran Murder Case) आता नवीन माहिती समोर आली आहे. अँटिलिया कार स्फोटक (Antilia car explosive) आणि मन्सुख हिरेन हत्या (Mansukh Hiran Murder) प्रकरणाला अनेक महिने उलटून गेले आहे. पण अजूनही या प्रकरणात खळबजनक माहिती समोर येत आहे. गुरुवारी विशेष NIA कोर्टात (special NIA court) सुनावणी (hearing) झाली. यावेळी मन्सुख हिरेनच्या हत्येसाठी (Mansukh Hiran Murder) 45 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा संशय NIA ने व्यक्त केला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मारेकरी नेपाळला पळून गेला
एनआयएने (NIA) कोर्टात सुनावणी वेळी केलेला दावा हा आर्थिक व्यवहारांची (financial transaction) जी माहिती मिळाली त्या आधारावर केला आहे. लाल रंगाची तवेरा गाडीत (red Tavera car) मन्सुख हिरेन यांची हत्या (Mansukh Hiran Murder) केल्यानंतर मारेकरी नेपाळला (Nepal) पळून गेला, असेही एनआयएने सांगितले. 4 मार्चला घोडबंदर रोडवर (Ghodbunder Road) हिरेन सोबत मारेकरी (killer) दिसले, ते सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) मिळाल्याचे NIA सूत्रांनी सांगितले.

हत्येसाठी कोणी पैसा पुरवला ?
एनआयए कोर्टासमोर (NIA Court) आरोपी सतीश तिरुपती मुतकोरी Satish Tirupati Mutkori आणि मनिष बसंत सोनी Manish Basant Soni यांना गुरुवारी हजर करण्यात आले.
एनआयएने दोन्ही आरोपींची आणखी पाच दिवसांची कोठडी (custody) वाढवून मागितली.
मन्सूख हिरेन यांच्या हत्येसाठी (Mansukh Hiran Murder) 45 लाख रुपये इतकी रक्कम मोजल्याचा एनआयएला (NIA) संशय आहे.
मन्सुख हिरेनच्या हत्येसाठी कोणी पैसा पुरवला ? ते एनआयएने सांगितले नाही.
असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

अँटिलिया व हिरेन प्रकरणात कोट्यावधीचा व्यवहार
अँटिलिया बाहेर स्फोटकानी भरलेली कार (Antilia car explosive) सापडली,
त्यावेळी ती कार मन्सुख हिरेन ((Mansukh Hiran) यांच्याकडे होती.
कार सापडल्यानंतर हिरेन यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) याचे आदेश मान करण्यास नकार दिल्याचे बोलले जाते.
45 लाख हे फक्त हिमनगाचं टोक आहे.
परंतु प्रत्यक्षात अँटिलिया आणि हिरेन हत्या (Antilia and Hiren murder) या दोन प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा व्यवहार असल्याचा दावा एनआयएने (NIA) केला आहे.

आरोपीकडून रोख रक्कम जप्त
हिरेन यांची हत्या करणाऱ्या एका आरोपीकडून 35 हजाराची रोख रक्कम ताब्यात (cash seized) घेतल्याचे सरकारी वकिलाने (Public Prosecutor) कोर्टाने सांगितले.
बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या (Assistant Inspector of Police Sachin Vaze) निर्देशावरुन ही हत्या झाल्याचा आरोप आहे.
या सर्व प्रकरणावरुन राज्यात खळबळ उडाली असून याचे राजकारणावर पडसाद उमटले आहेत.

Web Titel : Mansukh Hiran Murder Case hitmen were paid rs 45 lakh to kill mansukh hiran nia tells court