Mansukh Hiren Murder Case | ‘NIA’ चा आरोपपत्रात मोठा खुलासा ! प्रदीप शर्मांना दिली होती मनसुख हिरेनच्या हत्येची जबाबदारी; वाझेनं दिली होती मोठी रक्कम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Mansukh Hiren murder case | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ आढऴून आलेली कार तसेच मुंबईचे प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरेन (Mansukh Hiren Murder Case) यांच्या हत्येमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी सध्या बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्यावर आरोप करण्यात आले. या दोन्ही प्रकरणात त्यांची NIA कडून चौकशी सुरु आहे. मात्र, यादरम्यान मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे.

NIA च्या आरोपत्रानुसार एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना मनसुख हिरेन यांना मारण्याचं काम सोपवण्यात आलं होतं.
यासाठी शर्मा यांना सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या कडून ‘मोठी रक्कम’ देण्यात आली होती.
असा खुलासा NIA च्या आरोप पत्रातुन केला गेला आहे.
सचिन वाझेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ही माहिती समोर आलीय.
आरोपपत्रातून मनसुख हिरेनला संपवण्याचा कट रचल्याचा खुलासा झालाय.
प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलार यांच्यामार्फत ही घटना घडवून आणली होती.
दरम्यान, हे काम प्रदीप शर्मा (A-10) ला देण्यात आलं होतं.
हिरेनची हत्या करण्याचं काम हाती घेतल्यानंतर या षडयंत्रात आरोपी शर्मानं आरोपी
संतोष शेलार (A-6) शी संपर्क साधला.
आणि पैशासाठी हत्या करु शकतो का? असं विचारलं होतं.

आरोपी संतोष शेलार यांनी यासाठी आपला होकार दिला होता.
मनसुख हिरेनच्या हत्येपूर्वी 2 मार्चला वाझेनं (Sachin Vaze) हिरेनसोबत मीटिंग केली होती.
यादरम्यान त्याच्यासोबत इतर 2 पोलीस सुनील माने आणि प्रदीप शर्मा (Sunil Mane and Pradip Sharma) उपस्थित होते.
तर, मनसुख हिरेन याला ओळखता यावं म्हणून सचिन वाझेनं या दोघांनाही सोबत नेलं होतं.
दक्षिण मुंबईत स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार (Scorpio car) आढळल्यानंतर एका आठवड्यानंतर ही बैठक झाली होती. असं आरोपत्रात सांगितले आहे.

 

रक्कम मिळाल्यानंतर प्रदीप शर्मानं शेलारला फोन केला आणि लाल टवेरा कारची माहिती मिळवली.
याच गाडीचा वापर हिरेनची हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केला जाणार होता.
वाझे आणि माने यांच्यात ठरल्याप्रमाणे 4 मार्च रोजी सुनील मानेनं क्रिकेट सट्टेबाज नरेश गोटकडून मिळालेल्या खोट्या सिमद्वारे मनसुख हिरेनला मालाडमधील पोलीस म्हणून कॉल केला होता.

या दरम्यान, सचिन वाझेनं सुरुवातीलाच हिरेनची अटक आणि विशेषत: ATS च्या चौकशीपासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जाण्यास म्हटलं होतं.
तर, हिरेन यावर तयार झाला आणि ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सुरज वॉटर पार्कजवळ पोलीस अधिकाऱ्याला भेटला. मानेनं हिरेनला सोबत घेतलं आणि शेलारपर्यंत पोहोचवलं.
शेलार आधीपासून टवेरामध्ये मनीष सोनी, सतीश मोतुकारी आणि आनंद जाधव आगोदरच वाट बघत होते. नंतर या चौघांनी गाडीतच मनसुख हिरेनची हत्या केली आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला.
NIA ने दोन्ही प्रकरणांचा तपास केला. दरम्यान हे सगळं कारस्थान सचिन वाझेचं असल्याचा खुलासा NIA ने केला आहे.

 

Web Title : Mansukh Hiren Murder Case | encounter specialist pradeep sharma got job of killing mansukh hiren nia chargesheet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | ‘तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली तुझा गेमच करतो’ ! मारहाण होत असताना मदत न केल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न 

Fire in Indonesia | इंडोनेशियाच्या तुरुंगात भीषण आग; 40 कैदी मृत्युमुखी

Gold Price Today | सोने-चांदीच्या किमतीत बदल, जाणून घ्या आज किती स्वस्त मिळतेय 10 ग्राम सोने?