Mansukh Hiren Murder Case | मनसुख यांची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाखाचा व्यवहार; NIA चा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mansukh Hiren Murder Case । प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली कार आढळल्यानंतर ठाण्याचे प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरेन (Mansukh Hiren Murder Case ) यांची हत्या झाली. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या हत्येननंतर पोलीस प्रशासनात देखील खळबळ उडाली. मनसुख यांची हत्या नेमकी कोणी केली ? याबाबत अनेक चर्चेला उधाण आलं होतं. यावरून राज्यात राजकारणात देखील सत्ताधारी आणि विरोधकात खंडाजंगी सुरु होती. तर याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थाने आता एक महत्वाची माहिती दिली आहे. सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन हिरेन यांची हत्या घडवून आणल्याचा एक खळबळजनक खुलासा NIA ने विशेष कोर्टात (Court) केला आहे.

NIA विशेष कोर्टात माहिती देताना असं सांगितलं आहे की, ‘आरोपींनी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिल आहे. कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्यांनतर मनसुख घाबरले होते. म्हणूनच पुरावा नष्ट करण्यासाठी मनसुख यांची हत्या केली गेली असा दावा NIA ने केलाय. NIA च्या विशेष कोर्टात (Special Court of the NIA) याप्रकरणी सुनावणी झाली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मुंबईतील कार मायकल रोडवर जिलेटीच्या कांड्यानी स्फोटकांनी भरलेली एक स्कार्पिओ गाडी आढळली होती. हिरव्या रंगाची ही स्कार्पिओ कार मनसुख (Mansukh Hiren) यांच्या मालकीची होती. स्फोटकांनी भरलेली ही गाडी रस्त्यावर सापडल्याने याप्रकरणी तपास या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने आपल्या हाती घेतला. तर, ही गाडी मनसुख यांच्या नावावर असल्यानं हिरेन यांच्या अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान, त्यांना चौकशीसाठी अनेकवेळा बोलावलं होतं. यामुळे ते घाबरले होते.

मुख्यतः म्हणजे, हिरेन (Mansukh Hiren) यांनी आपलं तोंड उघडलं तर सर्व बाब वर येईल.
यासाठी मुख्य आरोपींनी सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन मनसुख यांची गेम केली.
नंतर, मनसुख यांचा मृतदेह समुद्राच्या खाडीत आढळून आला होता.
संबंधित हिरवी स्कॉर्पिओ कार आणि पांढरी इनोव्हा कार चालवणारे दुसरे तिसरे कोणी
नसून गुन्हे गुप्तचर युनिट (CIU) चे पोलीस असल्याचा खुलासा NIA ने केला होता.

Web Title : Mansukh Hiren Murder Case | nias sensational revelation in mansukh hiren
murder case 45 lac contract for murder

eAadhaar | आधारसोबत नसताना कसे पूर्ण होईल बँकिंगपासून तिकिट घेण्यापर्यंतचे प्रत्येक महत्वाचे काम, UIDAI ने दिली मोठी अपडेट

Crime News | इमारतीवरून नवजात बालिकेला खाली दिले फेकून;
विरारमधील धक्कादायक घटना

‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान
भाड्याने देण्याची केली घोषणा