Mansukh Hiren Murder Case | सचिन वाझेचा चौकशी समितीसमोर धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘त्या प्रकरणात मी फक्त प्यादा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अँटेलिया स्फोटक (Antelia explosive) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) अटकेत असलेल्या सचिन वाझेने (sachin vaze) चौकशी समीतीसमोर या संपूर्ण प्रकरणाचा खुसाला केला आहे. वाझेला कोरोना काळात सेवेत घेतल्यानंतर पुन्हा बडतर्फ करण्यात आले होते. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) सध्या त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान त्याने ‘मी एक प्याद’ असल्याचा खुलासा चांदीवाल समितीसमोर (Chandiwal Committee) केला आहे. उद्या त्याची उलटतपासणी होणार आहे.

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खंडणीचा (ransom) आरोप केला होता. देशमुख खंडणी वसूल करण्यासाठी सचिन वाझेचा वापर करत होते, असा आरोप करण्यात आला. सध्या परमबीर सिंग बेपत्ता असून ते सध्या कुठे आहेत हे समजू शकले नाही. तर वाझे सध्या कारागृहात आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्याची चौकशी सुरु आहे.

 

 

दरम्यान, आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या वकिलांनी परमबीर सिंह हे देशातच असून त्यांच्या जिवाला धोका असल्याने ते लपून बसल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच पुढील 48 तासात सीबीआयसमोर (CBI) हजर होणार असल्याची माहिती वकिलांनी दिली. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) त्यांना दिलासा दिला आहे. अटकेपासून संरक्षण दिले आहे.

 

Web Title :- Mansukh Hiren Murder Case | sachin waze explains his role in mansukh hiren murder case said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा