Mansukh Hiren Murder Case | ‘त्या’ दिवशी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांच्या केबिनमध्ये होते प्रदीप शर्मा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Mansukh Hiren Murder Case | मुंबईचे प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरेन (Mansukh Hiren Murder Case) हत्या प्रकरणात वेगवेगळे गुढ समोर येत आहेत. मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर पोलीस दलात आणि राज्यात देखील मोठी खळबळ उडाली. वेगवेगळ्या माहितीनंतर आता आणखी एक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन ज्या दिवशी बेपत्ता झाले होते. त्या दिवशी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिह (Parambir Singh) यांच्या केबिनमध्ये माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) उपस्थित होते. सचिन वाझेनेच (Sachin Vaze) मनसुख हिरेन बेपत्ता झाल्याची आणि त्याचा मृतदेह रेतीबंदर येथे आढळल्याचे वृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते.

आताच्या समोर आलेल्या माहितीनुसार, इतर अधिकारी आयुक्तांच्या केबिनमध्ये पोहचण्या आगोदरच सचिन वाझे (Sachin Vaze) थेट आयुक्तांना ही माहिती सांगण्यासाठी गेला.
त्त्या दरम्यान माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) देखील तेथे उपस्थित होते.
वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस आयुक्तांच्या भेटीला गेल्यानंतर प्रदीप शर्मा हा आयुक्तांच्या केबिनमधून बाहेर पडत होता.

 

दरम्यान, सचिन वाझेबरोबर (Sachin Vaze) फाईव्ह स्टार हाॅटेलात जात असलेल्या महिेलेची देखील माहिती उघड झाली आहे.
NIA कडुन दाखल केलेल्या आरोपत्रातुन याबाबत माहिती समोर आलीय.
स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला सचिन वाझे (Sachin Vaze) सध्या तुरुंगात आहे. वाझे या महिलेचा ग्राहक होता.
गतवर्षी ऑगस्ट महिन्यापासून वाझे या महिलेला खर्चासाठी म्हणून महिन्याला 50 हजार रुपये देत होता.
अशी माहिती समोर आलीय. इतकेच नाही तर. त्याने स्थापन केलेल्या एका कंपनीचे संचालकही बनवले.
या कंपनीच्या खात्यात 1.25 कोटी रुपये कुठून आले? त्या पैशांचा स्त्रोत काय होता? ते माहित नसल्याचे या महिलेने NIA अधिकाऱ्यांना चौकशीत सांगितले.
दरम्यान, वाझेला आपण 2011 साली भेटल्याचे महिलेने तिच्या जबाबात म्हटलं आहे.

 

Web Title : Mansukh Hiren Murder Case | when mansukh hiren disappeared that time pradeep sharma is in cabin of parambir singh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पुण्यात 10 दिवस जमावबंदी लागू

Bombay High Court | मुंबई उच्च न्यायालयाचा कंगनाला दणका ! सुशांत सिंह प्रकरणातील याचिका फेटाळली

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे