डोळे निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ मंत्र अत्यंत उपयोगी, त्रासच होणार नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चाक्षुषोपनिषदकृष्ण यजुर्वेद शाखेची उपनिषद आहे. डोळे निरोगी राहण्यासाठी या उपनिषदात सूर्य प्रार्थनेचा मंत्र देण्यात आला आहे. या मंत्राचे नियमित पठण केले तर डोळ्यांच्या अनेक रोगांपासून संरक्षण मिळते. विशेष म्हणजे ज्या लोकांची दृष्टी लहानपणापासूनच कमकुवत झाली असेल त्यांनी खासकरून या मंत्राचा जाप केल्याने फायदा होतो.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी सूर्य मंत्र

विनियोग –

ॐ अस्याश्चाक्षुषीविद्याया अहिर्बुध्न्य ऋषिः, गायत्री छन्दः, सूर्यो देवता, ॐ बीजम्, नमः शक्तिः, स्वाहा कीलकम्, चक्षूरोगनिवृत्तये जपे विनियोगः।

चक्षुष्मती विद्या –

ॐ चक्षुः चक्षुः चक्षुः तेजस्थिरोभव ।

मां पाहि पाहि । त्वरितम् चक्षूरोगान् शमय शमय ।

ममाजातरूपं तेजो दर्शय दर्शय ।

यथाहमंधोनस्यां तथा कल्पय कल्पय ।

कल्याण कुरु कुरु यानि मम पूर्वजन्मोपार्जितानि चक्षुः प्रतिरोधक दुष्कृतानि सर्वाणि निर्मूलय निर्मूलय ।

ॐ नमश्चक्षुस्तेजोदात्रे दिव्याय भास्कराय ।

ॐ नमः कल्याणकराय अमृताय ॐ नमः सूर्याय ।

ॐ नमो भगवते सूर्याय अक्षितेजसे नमः ।

खेचराय नमः महते नमः रजसे नमः तमसे नमः ।

असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ।

उष्णो भगवान्छुचिरूपः हंसो भगवान् शुचिप्रतिरूपः ।

ॐ विश्वरूपं घृणिनं जातवेदसं हिरण्मयं ज्योतिरूपं तपन्तम्।

सहस्त्ररश्मिः शतधा वर्तमानः पुरः प्रजानामुदयत्येष सूर्यः।।

ॐ नमो भगवते श्रीसूर्यायादित्यायाऽक्षितेजसेऽहोवाहिनिवाहिनि स्वाहा।।

ॐ वयः सुपर्णा उपसेदुरिन्द्रं प्रियमेधा ऋषयो नाधमानाः।

अप ध्वान्तमूर्णुहि पूर्धि-चक्षुर्मुग्ध्यस्मान्निधयेव बद्धान्।।

ॐ पुण्डरीकाक्षाय नमः। ॐ पुष्करेक्षणाय नमः। ॐ कमलेक्षणाय नमः। ॐ विश्वरूपाय नमः। ॐ श्रीमहाविष्णवे नमः। ॐ सूर्यनारायणाय नमः।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।।

य इमां चाक्षुष्मतीं विद्यां ब्राह्मणो नित्यमधीयते न तस्य अक्षिरोगो भवति।

न तस्य कुले अंधो भवति न तस्य कुले अंधो भवति। अष्टौ ब्राह्मणान् ग्राहयित्वा विद्यासिद्धिर्भवति ।

विश्वरूपं घृणिनं जातवेदसं हिरण्मयं पुरुषं ज्योतीरूपं तपंतं सहस्ररश्मिः

शतधावर्तमानः पुरःप्रजानामुदयत्येष सूर्यः ॐ नमो भगवते आदित्याय।

चाक्षुषोपनिषद्ची त्वरित फळ देण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे –

जर कुठलाही डोळ्यासंबंधीचा आजार असेल तर अशा व्यक्तीने या पद्धतीचा फायदा घ्यावा. ज्या लोकांना डोळ्यांचा आजार असतो त्यांना रविवारचा दिवस अतिशय शुभ असा असतो. (जर हा रविवार शुक्ल पक्षाचा किंवा रविपुष्य योगाचा असेल, पण शक्य नसल्यास कुठलाही रविवार घेता येऊ शकतो.) रविवारी सकाळी एका तांब्याच्या धातूच्या ताटलीमध्ये खालील दिलेले यंत्र हे प्रतिष्ठापित करावे. या यंत्राखाली ४ शब्द लिहायचे आहेत आणि हे शब्द हळदीच्या साहाय्याने लिहावेत. असे आहे यंत्र :-

८१५२७

६३१२११

१४९८१

४५१०१३

मम चक्षुरोगान् शमय शमय

सर्वप्रथम पूर्वीकडे तोंड करून बसावे आणि या यंत्रावर तांब्याच्या वाटीत चतुर्मुखी साजूक तुपाचा दिवा लावावा. तसेच गंध, अक्षता, फुले वाहून या यंत्राची पूजा करावी. हळदीच्या माळीने ‘ॐ ह्रीं हंस:’ या बीजमंत्राच्या ६ वेळेस माळ जपावी. तत्पश्चात चाक्षुषोपनिषदचे १२ वेळा पठण करावे आणि बीज मंत्राच्या ५ माल जपावी.

आपण जेव्हा हे पठण करणार त्यापूर्वी एका तांब्याच्या भांड्यात तांबडे फुल, तांबडे चंदन आणि पाणी ठेवावे. या पाण्याने जप पूर्ण झाल्यावर सूर्याला अर्घ्य द्यावे आणि प्रार्थना करावी की माझे ह्या नेत्ररोगास त्वरित आराम मिळू द्या. दर रविवारी असे करावे आणि दिवसभरात केवळ एकदाच आळणी जेवण करावे. असे केल्याने डोळ्याचे विकार नाहीसे होतात.

You might also like