पोलीसनामा ऑनलाइन – Mantra For Good Luck | दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी मंत्रांचे उच्चारण खुप लाभदायक ठरते. सकाळी झोपेतून उठताच काही मंत्राचा जप केल्याने तुमचा पूर्ण दिवस चांगला जातो. या मंत्रांबाबत (Mantra For Good Luck) जाणून घेवूयात –
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती.
करमूले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम
– दररोज सूर्योदयापूर्वी या मंत्राचा जप करावा. डोळे उघडताच भगवान सूर्याचा हा मंत्र दोन्ही तळवे जोडून म्हणा.
समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे
– बिछान्यातून उठल्यानंतर जमीनीवर पाय ठेवण्यापूर्वी पृथ्वी मातेचा मंत्र आवश्य म्हणा. या मंत्राच्या माध्यमातून पृथ्वी मातेकडे जमीनीवर पाय ठेवण्याच्या नाईलाजासाठी क्षमा मागावी.
‘गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती.
नर्मदे सिंधु कावेरी जल स्मिन्सन्निधीं कुरु..’
– हा मंत्र सकाळी आंघोळ करताना म्हणा. यामुळे मन पवित्र होते.