मंत्रोच्चाराने पीक वाढते…! कुलगुरूंचा अजब दावा

अकोला: पोलीसनामा ऑनलाईन

खरेतर विद्यापीठ म्हणजे विद्येचे माहेरघर पण विद्यापीठातच खुद्द कुलगुरू यांनीच खळबळजनक वक्तव्य केले आहे. “मंत्रोच्चारामुळे पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होत असून पीक जोमाने वाढते”, असा अजब दावा अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केला. कुलगुरूंच्या या ‘मंत्रोच्चारा’वरून विदर्भात संताप व्यक्त होत असून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

शेती शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगीकृत कलागुणांना वाव मिळावा आणि ग्रामीण भागातून कलाकार निर्माण व्हावेत या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारा कृषी महाविद्यालयाच्या स्व. के. आर. ठाकरे सभागृहात आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव २०१८ आयोजित करण्यात आला आहे. याच्या उद्‌घाटनप्रसंगी कुलगुरू बोलत होते. देशी संगीताची जादू संपूर्ण विश्वावर असून अमेरिकेसारख्या देशात शास्त्रीय संगीत गुंजताना दिसत आहे. तर जनावरांच्या दूध उत्पादनात संगीतामुळे होत असलेली वाढ आणि मंत्रोच्चाराचा पिकांच्या वाढीवर होणारा सकारात्मक परिणाम, मानसिक थकवा दूर करण्यासाठी तबला आणि बासरीची लय संगीताचे महत्व विशद करणारी असल्याचेही डॉ. भाले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले होते. यातील पिकांच्या वाढीवर मंत्रोच्चाराचा परिणाम होत असल्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे. तर कुलगुरू डॉ. भाले यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. पण, काही शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते यावरून संतप्त झाले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’26bb98b0-cac0-11e8-b466-0907355d8ffe’]

‘मंत्रोच्चार आणि पीकवाढीचा संबंध नाही’

लयबद्ध संगीताचा दुधाळ गायींवर परिणाम झाल्याची काही उदाहरणे आहेत. मात्र मंत्रोपचाराने पिकाच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी अंनिसशी बोलताना स्पष्ट केले. डॉ. भाले यांनी ‘मंत्रोपचाराचा पिकांच्या वाढीवर अनुकूल परिणाम होतो’ असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य अवैज्ञानिक असल्याचा आक्षेप अ. भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक पुरुषोत्तम आवारे यांनी घेतला होता. या विषयावर कुलगुरू डॉ.भाले यांचे अधिकृत मत जाणून घेण्यासाठी पुरुषोत्तम आवारे, डॉ. स्वप्ना लांडे, चंद्रकांत झटाले आणि आशू उगवेकर यांच्या शिष्टमंडळाने रविवारी दुपारी डॉ.भाले यांची भेट घेतली. ‘माझा पिंड संशोधकाचा असल्यामुळे जे प्रयोगाअंती सिद्ध होते तेच स्वीकारतो. मंत्रोपचाराने कोणत्याही पिकावर काहीही परिणाम होत नसल्याचे माझे मत असून काहीतरी गैरसमजातून ते वक्तव्य प्रकाशित झाले’, असे डॉ. भाले यांनी स्पष्ट केल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

[amazon_link asins=’B06ZZB71TB,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a38cb87d-cac0-11e8-b204-2fab47b6f322′]