साहित्य उत्पादन करणार्‍या कंपन्यांच्या हालचालीमुळं ड्रॅगनचा ‘तिळपापड’, म्हणाला – ‘भारत नाही घेऊ शकत चीनची जागा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकामागून एक अनेक कंपन्या चीनमधून भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्याच्या घोषणेने ड्रॅगन भडकला आहे. चिनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाईम्समध्ये लिहिले आहे की, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतानाही भारत मोठे स्वप्न पाहत आहे, पण ते चीनला पर्याय ठरणार नाहीत. चीनसोबत भारताची तुलना करण्यासाठी त्यांनी पाश्चात्य माध्यमांना दलालही म्हटले.

विशेष म्हणजे जर्मन शू कंपनीने आपले उत्पादन युनिट चीनमधून आग्रा येथे हलवण्याविषयी बोलले आहे, तर ओप्पो आणि ऍपल सारख्या मोबाइल कंपन्यांनीही भारतात शिफ्ट होण्याबद्दल म्हटले आहे. असे सांगितले जात आहे की, अमेरिकेसह व्यापार युद्धामुळे आणि आता कोरोना महामारीमुळे पुरवठा साखळी प्रभावित झाल्यामुळे जवळपास एक हजार कंपन्यांना चीनमधून बाहेर पडायचे आहे.

त्यांनी लिहिले आहे की, “माध्यमांच्या वृत्तानुसार, भारतातील उत्तरेकडील राज्य उत्तर प्रदेशने चीनमधून मॅन्युफॅक्चरिंग युनिट शिफ्ट करण्याबाबत कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी एक इकॉनॉमिक टास्क फोर्स बनवली आहे. मात्र, एवढे प्रयत्न करूनही कोरोना महामारीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर जो दबाव आहे त्यामुळे भारत जगासाठी नवीन कारखाना होईल, अशी अपेक्षा करणे हा एक भ्रम आहे.”

तसेच चीनला भारताचा पर्याय सांगणाऱ्यांना कट्टरपंथी म्हणत त्यांनी पुढे लिहिले की, भारत चीनची जागा घेण्याच्या योग्य मार्गावर आहे असे म्हणणारे कट्टरपंथी राष्ट्रवादी अभिमान बाळगतात. एवढेच नाही तर चीनने हा विषय सीमा वादाशी देखील जोडला आणि म्हटले की आर्थिक मुद्द्यावरून हा वाद लष्करी पातळीवर पोचला आहे. ज्यामुळे त्यांनी असे गृहीत धरले आहे की, ते आता सीमेच्या वादावरून चीनचा सामना करू शकतात. ही विचारसरणी धोकादायक आहे.

ग्लोबल टाईम्सने आपला राग पाश्चात्य माधम्यांवरही व्यक्त केला आणि म्हटले पाश्चात्य माध्यमे भारताची तुलना चीनशी करुन उत्साहाने दलाली करत आहेत. यामुळे नेमक्या परिस्थितीबद्दल काही भारतीयांमध्ये संभ्रम आहे.