मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला अभिनयात नाही तर, ‘या’ क्षेत्रात करायचे आहे करिअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही लवकरच बाॅलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. इतकेच काय तर मानुषीला फराह खान बालिवूडमध्ये लाँच करणार आहे असेही बोलले जात होते. दरम्यान मानुषीने याबाबत कधीच काही सांगितले नाही. त्यामुळे ही गाेष्ट अद्याप गुलदस्त्यातच होती. परंतु आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण मानुषीला अभिनयात पदार्पण करायचे नसून शिक्षण पूर्ण करुन हृदयाची डॉक्टर बनायचं आहे. मानुषी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिचे स्वप्नन, ध्येय हे अभनेत्री बनण्याचे नाही हे स्पष्ट झाले आहे.

View this post on Instagram

“Not every mystery is meant to be solved”

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

मिस वर्ल्ड बनल्यानंतर मानुषीला सिनेमा मिळेल असे सर्वांनाच वाटत होते. परंतु मिस वर्ल्ड किताब पटकावून देखील मानुषी सिनेमात झळकताना काही दिसली नाही. अभिनेत्री बनण्याचे नंतर मात्र त्याआधी डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न आहे असे मानुषीने एका मुलाखतीत म्हटले आहे.

View this post on Instagram

“You are only a smile away from happiness”

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

एका मुलाखतीत बोलताना मानुषी म्हणाली की, “मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर माझ्यावरील जबाबदाऱ्या आणखी वाढल्या होत्या. त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करायचं मी ठरवलं होतं. माझ्याप्रमाणेच आधी बऱ्याच मिस इंडिया होत्या ज्यांनी आपलं शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. मात्र वैद्यकीय शिक्षणातून तुम्हाला जीवनात बऱ्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्यामुळेच मला माझं वैद्यकीय शिक्षण अपूर्ण सोडायचं नाही. मी काही काळ ब्रेक घेऊन माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे.” असे मानुषीने स्पष्ट केले आहे. मुख्य म्हणजे मिस वर्ल्ड संस्थेच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करायला आवडेल असेही यावेळी मानुषी हिने म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us