ब्लॅक गाऊन मधील मानुषी छिल्लरचा बोल्ड लुक व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर आपल्या स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्या स्टनिंग लुकचे फोटो नेहमीच समोर येत असतात. मानुषीने नुकतेच फोटोशुट केले आहे. मानुषीचे काही नवीन फोटो सध्या सोशळ मीडियावर चांगलचे व्हायरल होताना दिसत आहे. मानुषीने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये मानुषीने ब्लॅक कलरचा नेकलाईन गाऊन घातल्याचे दिसत आहे. या लुकमध्ये मानुषी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. कर्ली हेअर, स्मोकी मेकअप आणि न्यूड लिपस्टीकने मानुषीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे. या लुकमध्ये मानुषी गॉर्जियस दिसत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

एका फोटोला कॅप्शन देताना मानुषीने म्हटले आहे की, “Notm Afraid to be different” (वेगळे बनण्यासाठी मी अजिबात घाबरत नाही.) काही दिवसांपूर्वी मानुषी छिल्लरने वेडिंग फोटोशुट केलं होतं. तिचा हा फोटो खूपच चर्चेत राहिला होता. डिझायनर सब्यासाचीसाठी ती मॉडेल बनली होती. हे वेडिंग फोटोशुट हिंदी महासागरस्थित सेशेल्सच्या समुद्र किनारी करण्यात आले होते.

https://www.instagram.com/p/BwCpMcmnuZP/

सध्या मानुषी बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. अशीही माहिती समोर येत आहे की, मानुषी, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनणाऱ्या सिनेमातून डेब्यू करणार आहे. परंतु याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले होते की, तिला आमिर खान सोबत काम करायचे आहे. ती म्हणाली होती की, “मी आमिर खानच्या सिनेात काम करु इच्छित आहे. कारण ते सामाजिक प्रश्नांवर सिनेने बनवतात.”