‘या’ मिसवर्ल्डने दिल्या मोदींना विजयाच्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने दणदणीत विजय मिळवला. अनेक सेलेब्रेटींनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. त्यातच आणखी एका सेलिब्रटीची भर पडली आहे. २०१७ ला मिसवर्ल्डचा ‘किताब जिंकणाऱ्या मानुषी छिल्‍लरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत तिने ट्विट केले आहे.

नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना मानुषी छिल्‍लरने ट्विटवर म्हंटल आहे की, ‘मी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन करते. भारताने लोकशाही अधिकारांचा वापर केला आहे आणि आता देशाच्या उज्जवल भविष्यासाठी नागरिकांनी कर्तव्ये पार पाडण्याची वेळ आली आहे. मी या निवडणुकी पहिल्‍यांदा मतदान केले आणि माझं मत खास ठरलं.’

मानुषी लवकरच अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. मानुषीने हा चित्रपट साइन केला असून यात ती ‘संयुक्ता’ची भूमिका साकारणार आहे. मानुषी छिल्लरच्या बॉलीवूड प्रवेशाविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. तिच्या बॉलिवूड पदार्पणाची सर्वांनाच उत्सुकता आहे. बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट असल्याने मानुषी आपल्या डेब्यूसाठी विशेष मेहनत घेत आहे. त्यासाठी ती कार्यशाळेत अभिनयासोबत नृत्याचे धडे घेत आहे.

You might also like