रिअल लाईफमध्ये खुपच धाडसी ‘ही’ अभिनेत्री, ‘कोरोना’मुळं अडकला पहिला सिनेमा

मुंबई – तुम्हाला आठवतीए का 2017 ची विश्वसुंदरी? अहो, आपली भारतीय मॉडेल विश्वसुंदरी मानुषी छिल्लर. नाजूक आणि तरीही तितकीच बोल्ड असलेल्या मानुषीनी ती स्पर्धा आपल्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेने गाजवली होती. आज आहे मानुषीचा 23 वा वाढदिवस आहे, त्यामुळे तिला शुभेच्छा देऊया. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानुषी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे पण लॉकडाउनमुळे तिचा पहिलाच सिनेमा अडकून पडला आहे.

मानुषीनी साईन केलेल्या पहिल्या सिनेमाचं नाव आहे ‘पृथ्वीराज.’ हो, तुम्ही, आम्ही तमाम चित्रपटरसिक आतुरतेने ज्या चित्रपटाची वाट पाहतोय तोच हा सिनेमा. राजा पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत असेल अभिनेता अक्षय कुमार आणि संयोगितेची भूमिका साकारणार आहे मानुषी छिल्लर. याबाबत मानुषी म्हणाली, ‘ मला लहानपणापासूनच इतिहासाची आवड आहे. त्यामुळेच मी संयोगितेच्या भूमिकेकडे आकर्षित झाले.’ लॉकडाउन संपल्यावर मुंबई आणि राजस्थानात तयार झालेल्या 35 सेट्सवर या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे.