‘हैद्राबाद’ घटनेनंतर अभिनेत्री मनवा नाईकनं सांगितला काळजाची ‘धडधड’ वाढवणारा ‘तो’ प्रसंग !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हैद्राबादमधून 27 वर्षीय महिला डॉक्टरचा पाशवी बलात्कार आणि तिला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. या घटनेनं पूर्ण देश संतापला आहे. या घटनेला घेऊन जनतेमधून घेऊन तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अशातच आता अभिनेत्री मनवा नाईकनंही तिच्या सोबत घडलेल्या एका प्रसंगाबद्दल सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. फेसबुकवर तिनं याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

30 नोव्हेंबर रोजी तिच्यासोबत प्रवासात घडलेल्या घटनेचं वर्णन करताना आपल्या पोस्टमध्ये मनवा नाईक म्हणते, “गेल्या महिन्यात मी हरियाणा ते दिल्ली असा रात्री साडेनऊच्या सुमारास प्रवास करत होते. हृदयात धडधड सुरू होती. मनात निर्भयाचे विचार घोळत होते. मोबाईलमध्ये गुगल मॅप सुरू होता. नवराही माझ्या संपर्कात होता. विमानतळावर सुखरूप पोहोचण्यासाठी मनोमन प्रार्थना करत होते. टोल प्लाझावर गाडी थांबली असता 9 पुरुषांचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यातील एकानं मला पाहून गाणं गायला सुरुवात केली. मग तर माझ्या हृदयाचे ठोके अधिकच वाढले. चालकानं लवकरात लवकर गाडी काढावी असं वाटू लागलं. त्यानं तशी गाडी लवकर काढलीही. परंतु मी जर वेळीच निघाले नसते तर…” असं म्हणत मनवानं आपला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे.

If I may say so!When I was travelling from Haryana to Delhi airport last month at 9.30pm in a tourist car, my heart was…

Geplaatst door Manava Naik op Zaterdag 30 november 2019

सध्या मनवाची ही फेसबुक पोस्ट खूप व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांच्या भावना मांडल्या आहे. मुली आता त्यांच्याच देशात सुरक्षित नाहीत का असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like