Pune : यंदा बेपत्ता झालेल्या 1100 जणांपैकी 704 जणांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेपत्ता व्यक्तींचा स्थानिक पोलिस ठाण्यातून तपास केला जात असला तरी त्यांच्या तपासावर पोलीस आयुक्तालयातून पाठपुरावा केला जातो. प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांना तब्बल तीस दिवसांनंतर शोधण्यात पुणे पोलिसांना यश आलं. यासाठी पुणे पोलिसांनी खूप प्रयत्न केले. स्वतः निघून गेलेली व्यक्ती उद्योजक असल्यामुळे पोलिसांनी इतके पोलिस बळ लावले होते. त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी ठरली. परंतु, इतर सामान्य व्यक्ती हरवली तर पोलीस इतका प्रयत्न करतील का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला होता. दरम्यान, पुणे शहरात यावर्षी आत्तापर्यंत तब्बल ११०० जण बेपत्ता झाले असून, त्यापैकी ७०४ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.

याबाबत पोलिस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले, की हरवल्याच्या तक्रारीचे पुढे काय झाले त्यासाठी आयुक्तालय स्वतंत्र पथक तयार करण्यात आला आहे. या पथकाने जुन्या केसचा तपास करून अनेक लोकांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली केलं आहे. एकदा हरवलेली व्यक्ती काही काळाने परत येते परंतु घरचे लोक ही बाब पोलिसांना कळवत नाहीत, अशी अनेक प्रकरणे आढळून आले आहेत. व्यक्ती व्यक्तीच्या तपासात पोलिसांकडून भेदभाव केला जात नाही.

पाषाणकर यांनी आत्महत्या करीत असल्याचे पत्र लिहून ते गेले होते. त्यावेळी व्यवसायिक कारणावरून त्यांचे अपहरण झाले का? अथवा त्या कारणावरून निघून गेले असावेत ?अशी शंका तक्रारीमध्ये व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांनी आपल्या परीने सर्व प्रयत्न करून त्यांचा शोध लावला. १८ वर्षाखालील व्यक्ती जर सोडून गेली तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याचा तपास करतात. सर्वसाधारण हरवल्याच्या तक्रारीत घरातील तात्कालिक कारण असते. त्याचा तपास स्थानिक पोलिस ठाण्यावर केला जातो. त्यांना तपासासाठी तांत्रिक सहाय्य सामाजिक सुरक्षा विभागाकडून देण्यात येतं.

बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यावर जबाबदारी देण्यात आलेली असते. त्यांना सामाजिक सुरक्षा विभागातून तांत्रिक सहाय्य केले जाते. हरवल्याच्या तक्रारीबाबत काय तपास झाला त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र टीम नेमण्यात आली आहे.
बच्चनसिंह पोलीस, उपायुक्त, पुणे शहर