पुण्यात ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे तब्बल 11 हजार रुग्ण होते बेपत्ता, आरोग्य विभागाच्या पथकाने घेतला शोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. सक्रिय रुग्णांचा आकडाही 50 हजारांच्या पुढे गेला होता. या काळात आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचण्या वाढवल्या होत्या. त्यामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. पालिकेकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर Contact Tracing भर दिला असला तरी मनुष्यबळा अभावी कामात अडचणी येत होत्या. खासगी आणि शासकीय स्वाब चाचणी केंद्रांवर संबंधीत नागरिकांची पुरेशी माहिती घेतली जात नसल्याने तब्बल 11 हजारापेक्षा अधिक रुग्णांचा शोध लागत नव्हता. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तसेच आरोग्य विभागाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या Contact Tracing पथकांनी या रुग्णांचा शोध घेतला. या सर्व रुग्णांना निष्पन्न करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला आहे.

चाचणी केलेल्या नागरिकांचे पूर्ण नाव, पत्ते, मोबाईल क्रमांक तसेच नातेवाईकांची माहिती न घेतल्याने हे रुग्ण शोधण्यात अडचणी आल्या. अशा प्रकारचे जवळपास 11 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडतच नव्हते. त्यासाठी पालिकेने यंत्रणा राबवित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. स्थानिक क्षेत्रीय कार्यालय आणि पालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेने या रुग्णांचा शोध घेतला. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कोरोना चाचणी करून घेतली. त्याकरिता रिपोर्टींग सिस्टीम बसवण्यात आली. तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडील माहिती एकत्रित करण्यास सुरुवात केल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले. दुसऱ्या लाटेत 461 रुग्ण निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह म्हणून त्यांची नोंद झाली. तर, 264 रूग्णांची पॉझिटिव्ह म्हणून दुबार नोंदणी झाली. या काळात 5 हजार 456 रुग्ण नॉन ट्रेसेबल’ होते. तर, 6 हजार 92 जणांचा शोध घेणे शिल्लक होते. या सर्व 11 हजार 548 रुग्णांचा शोध घेतला आहे.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

 

दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त