खडसे यांच्यासोबत अनेक भाजप आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर !

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईनः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांचा अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. शुक्रवारी दुपारी वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली आहे. त्यामुळ भाजपला राज्यात मोठा धक्का बसला आहे. तसेच आगामी काळात अनेक राजकीय भूकंप पाहयला मिळतील. खडसे यांच्यासोबत येण्यासाठी अनेक आमदार इच्छुक ( Many bjp mla are prepraing -leave) असल्याचे ते म्हणाले.

याबाबत पाटील म्हणाले की, एक अनुभवी आणि राज्यातील विविध प्रश्नांची जाण असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल, त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असेही ते म्हणाले. खडसे यांच्यासोबत येण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. राजीनामा देऊन कोरोना काळात निवडणूका घेण शक्य नसल्याने हळूहळू त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ज्यांना तांत्रिक अडचणी आहेत, ते नंतर येतील. खडसे यांच्यासोबत कोण येणार याबाबत फारशी चर्चा केली नाही. खडसे यांचे नेतृत्व मानणारे, भाजपाकडून ज्यांचा हिरमोड झाला आहे, असे सगळी लोक राष्ट्रवादीत येतील, असे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीच्या कुटुंबात आल्याच स्वागत
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याने आनंद आहे. त्यांचे महाविकास आघाडीच्या कुटुंबात स्वागत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीत आल्यानंतर खडसेंना काय मिळणार
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल.त्यानंतर खडसे यांना मंत्रीमंडळात समावेश करण्यासाठी चर्चा सुरु आहे. यात शिवसेना – राष्ट्रवादी खात्यात अदलाबदल करून खडसेंना कृषीमंत्रीपद देणार असल्याची चर्चा आहे.

ऑडिओ क्लीप व्हायरल
खडसे यांना भाजपच्या राष्ट्रीय कायर्कारिणीत स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज होते. त्यापैकी एका समर्थकांना थेट खडसे यांना फोन करून राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विचारणा केली होती. त्यावर अगोदर त्यांच्याकडून प्रस्ताव येऊ द्या. ते आपल्याला मानाच स्थान देणार आहेत का, याची खात्री करूनच प्रवेश करू या, असे खडसे यांनी म्हटले होते. खडसे आणि कार्य़कर्त्याची ही व्हीडीओ क्लीप सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

काय म्हणाले होते शरद पवार
खडसे यांचे भाजपच्या उभारणीत मोठ योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने खडसे प्रखरतेने दिसूत होते. पण पक्षाने त्यांची नोंद घेतली नाही, असे त्यांना वाटत. त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची त्यांची भूमिका असू शकते, असे पवारांनी सांगितल्यामुळे खडसे यांचे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

You might also like