ऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार तुमच्या खिशावर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑक्टोबर यावेळस अनेक बदल घेऊन येत आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया एक ऑक्टोबरला नोटिफिकेशनसह सुरू होईल. 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. याशिवाय ऑक्टोबरमध्ये जे बदल होणार आहेत, त्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. जाणून घेवूयात ऑक्टोबर 2020 मध्ये होणारे बदल कोणकोणते आहेत…

फ्री मिळणार नाही एलपीजी सिलेंडर
पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस सिलेंडरची मुदत 30 सप्टेंबर 2020 ला संपत आहे. कोरोना काळात या योजनेतून मोफत गॅस सिलेंडर देण्यात आला होता. 1 ऑक्टोबरला सबसिडीवाले एलपीजी सिलेंडर आणि कामर्शियल गॅसचे रेटसुद्धा रिवाईज होतील.

मिठाई विक्रेत्यांसाठी नवा नियम
एफएसएसएआने नवे नियम जारी केले आहेत. एक ऑक्टोबर 2020 नंतर स्थानिक मिठाई दुकानात परात आणि डब्ब्यांमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईसाठी निर्मितीची तारीख तसेच वापराचा योग्य कालावधी इत्यादी माहिती दर्शवावी लागणार आहे.

घरबसल्या मिळतील या आर्थिक सेवा
एफडीच्या व्याजावर लागणारा टॅक्स वाचवण्यासाठी जमा करावा लागणारा फॉर्म-15जी आणि 15 एच, प्राप्तीकर किंवा जीएसटी चलान पिक करणे, अकाऊंट स्टेटमेंट रिक्वेस्ट, टर्म डिपॉझिट रिसीटच्या डिलिव्हरीची सुविधा सुद्धा ग्राहकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे. डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिस लाँच झाल्यानंतर आता आर्थिक सेवा ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील.

महागणार टीव्ही सेट
टीव्ही निर्मितीत वापरल्या जाणार्‍या ओपन सेलच्या आयातीवर पाच टक्के सीमा शुल्क एक ऑक्टोबरपासून पुन्हा लावले जाणार असल्याने टीव्हीच्या किंमती महागणार आहेत. सरकारने मागच्या वर्षी टीव्हीचा महत्वाचा पार्ट ओपन सेलवर एक वर्षासाठी म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत सीमा शुल्कात सूट दिली होती.

1 ऑक्टोबरपासून या ट्रांजक्शनवर लागेल टॅक्स
केंद्र सरकारने परदेशात पैसे पाठवल्यास टॅक्स वसूल करण्याचे नवीन नियम बनवले असून ते नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू होतील. परदेशात शिकणार्‍या मुलांना पैसे पाठवणार असाल किंवा परदेशात राहणार्‍या नातेवाईकाला आर्थिक मदत करायची असेल तर या रक्कमेवर 5 टक्के टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्सचा अतिरिक्त चार्ज भरावा लागेल. फायनान्स अ‍ॅक्ट, 2020 नुसार, आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीमअंतर्गत परदेशात पैसे पाठवणार्‍या व्यक्तीला टीसीएस द्यावा लागेल. एलआरएस अंतर्गत 2.5 लाख डॉलर वार्षिकपर्यंत पाठवू शकता, ज्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. यास टॅक्सच्या कक्षेत आणण्यासाठी टीसीएस द्यावा लागेल.

जीएसटी परिषद पाच ऑक्टोबरला
जीएसटी परिषदेची बैठक पाच ऑक्टोबरला होईल. यापूर्वी ही बैठक 19 सप्टेंबरला होणार होती. केंद्राने मागच्या महिन्यात निर्णय घेतला होता की, जीएसटी परिषदेची 41वी आणि 42वी बैठक 27 ऑगस्ट आणि 19 सप्टेंबरला होईल. मात्र, त्यावेळेपर्यंत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा निर्णय झाला नव्हता. जीएसटी परिषदेची पाच ऑक्टोबरला होणारी बैठक खुप महत्वपूर्ण असणार आहे, कारण केंद्र आणि राज्यांमध्ये जीएसटी संकलनात 2.35 लाख कोटी रुपयांच्या तूटीच्या आर्थिक व्यवस्थापनेच्या मुद्द्यावर वाद सुरू आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like