आगामी 24 तासात हवामानात मोठा ‘बदल’ ! देशात ‘या’ ठिकाणी मुसळधार ‘पाऊस’ तर ‘या’ ठिकाणी ‘थंडी’ ची लाट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या वातावरणात मागील 24 तासात अनेक बदल पाहायला मिळाले. या दरम्यान जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लद्दाख आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. पंजाब, हरियाणा, दिल्ली – एनसीआरमध्ये काही भागात पाऊस झाला आहे आणि उत्तर प्रदेशात पश्चिम भागात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्कायमेट नुसार पुढील 24 तासात उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होईल अशी शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो. अरुणाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वेत आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूरच्या काही भागात पाऊस होऊ शकतो.

येथे होणार पाऊस –
तमिळनाडूमध्ये काही भागात पावसाची शक्यता आहे. केरळमध्ये काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. दक्षिण कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेश येथे देखील पावसाच्या हलक्या सरी कोळसण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात काही भागात तापमान कमी होईल. पंजाब, हरियाणा, ओडिसाच्या काही भागात देखील पाऊस होऊ शकतो.

जास्त थंड वातावरण असणार नाही –
जे लोक कडाक्याच्या थंडीमुळे चिंतेत आहेत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण यंदा कडाक्याची थंडी पडणार नाही. भारतीय हवामान विभागानुसार शुक्रवारी सांगितले की डिसेंबर ते फ्रेबुवारीच्या दरम्यान तापमान जास्त असू शकते. देशाच्या उत्तरी भागात थंडीची परिस्थिती असेल. डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान किमान तापमान सामान्य असेल. आयएमडी विभागनुसार या ऋतूत आपल्या अंदाजाची माहिती दिली. हवामान विभागाने तापमान पहिल्याच्या तुलनेत जास्त राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या मते या वर्षी थंडीत तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात सोडून अधिकांश भागात तापमान सामान्यापेक्षा जास्त राहिलं. ज्यामुळे देशात थंडीच्या ऋतुत काही प्रमाणात उन्हाळा देखील जाणवू शकेल. हवामान विभागाने त्या भागात देखील थंडीची लाट येण्यास नकार दिला आहे ज्या भागात कडकडनारी थंडी असते. यात उत्तराखंड, छत्तीसगड, बिहार, झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगाना, जम्मू काश्मीर, हरियाणा आणि राजस्थान, मध्य महाराष्ट्र, लद्दाख, विद्रभ, सौराष्ट्र या भागांचा समावेश आहे.

Visit : Policenama.com