माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली : संभाजी भिडे

नाशिक:  पोलीसनामा ऑनलाईन

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिकमधील झालेल्या एका सभेत धक्कादायक विधान केले आहे. यामध्ये ते म्हणतात ‘माझा शेतातील अांबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते’, आपल्या शेतातील आंब्याचे दाखले देत पुढे त्यांनी हे आंबे खाऊन जवळपास १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा यावेळी दावा देखील केला. या सभे दरम्यान सध्याच्या सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार टिका करत त्यांनी शिवकालीन इतिहासाचे दाखलेही यावेळी दिले.

‘लग्न होऊन आठ-आठ, दहा-दहा,पंधरा-पंधरा वर्ष झालेल्यांना सुध्दा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांना, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल.रोज आंबे आणुन,माझ्याही बागेत,शेतात ते लावले. मी आता तुम्हाला साडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत १८० पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना,जोडप्यांना खायला दिलेत आणि १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंधत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे’.असे यावेळी संभाजी भिडे यांनी सांगितले.

पुढे ते असेही म्हणतात की, अहमदनगरला आता फक्त ‘अंबिकानगर’ म्हणायचं. शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले शिवाजी महाराज देवांना वाचवणारा देव होता. ३३ कोटी देव, १२ ज्योतिर्लिंग शिवाजी महाराज यांनीा वाचवले. संभाजी महाराज यांचे नाव एेकताच अंगात स्फुरण चढते. प्रत्येक पक्ष राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करतो. कुठल्याही पक्षाच्या झेंड्यात आडवी किवा उभी हिरवी रेघ आहे. मतासाठी हे सर्व लाचार आहेत. आदिलशाही,मुघलशीहीविरोधात शिवाजी महाराजांनी लढा दिला, मुसलमान देशाचे शत्रू आहेत. शिवाजी महाराजांचे सिंहासनासाठी केंद्र राज्य सरकारने पॅकेज दिले तरी ते स्वीकारणार नाही. असं भिडे म्हणाले.

दरम्यान प्रत्येक तालुक्यात दोन हजार कार्यकर्त्यांची तुकडी केली जाणार असून ही तुकडी राजगडावर जाईल, तसेच यामध्ये स्त्रियांना स्थान नसणार. महाराजांच्या सिंहासनासाठी शिवभक्तांनी पुढे आले पाहिजे. मात्र स्त्रियांनी जिजामातेच काम करावं,रणांगणावर उतरु नये आमची तशी इच्छा नाही. स्त्रियांना तुकडी बनविण्यास अनुमती नाही. असे भिडेंनी यावेळी सांगितले.

दारुविरोधी लढा तसेच बलात्कार करणाऱ्यांचे सरकारने हात-पाय कलम केलं पाहिजे, नाहीतर ते काम आम्ही हाती घेऊ, असा इशाराही संभाजी भिडेंनी दिला आहे.