कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलासा ! बोनस देण्यास सुरुवात, पगार कपातही मागे

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. लोकांमध्येही विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, बाजारपेठेत उत्साह दिसू लागला आहे. याचे सकारात्मक परिणाम होऊ लागले आहेत. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यास सुरुवात केली आहे.

व्होल्टास आणि विजय सेल्स यासारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला आहे. तर अर्बन कंपनीने पगारवाढीचे चक्र अलीकडे आणले आहे. गेल्याच आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्यांची पगारकपात मागे घेतली आहे. यासोबतच चल वेतनही अदा केले आहे. तसेच एकूण चल वेतनापैकी ३० टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. कोटक महिंद्र बँकेनेही उच्च पदाधिकाऱ्यांची पगारकपात मागे घेतली आहे. तसेच दूरचित्रवाणी क्षेत्रातील कंपन्यांनीही असाच निर्णय घेतला आहे, तर काही कंपन्या दिवाळीपूर्वी ५० टक्के बोनसही कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये दिलासा कोरोनाच्या संकटकाळात कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेऊन काम केले.