Coronavirus : संगमनेरमध्ये एकाचवेळी तब्बल 15 कोरोना संशयित

संगमनेर :  पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रुग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील 14 आणि तालुक्यातील 1 असे एकूण 15 नागरिक आल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब समोर येताच सोमवारी प्रशासनाने तात्काळ या 15 संशयितांना ताब्यात घेत अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी नागरिकांना जाण्यास व येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील मुकूंदनगर परिसरात दोन कोरोना रुग्ण सापडले. त्यांची चौकशी केली असता ते जामखेड येथे एका कार्यक्रमात गेल्याचे त्यांनी सांगितले. तेथे त्यांच्यासोबत संगमनेरमधील 15 नागरिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. हे सर्व जामखेडमध्ये दहा दिवस मुक्कामी होते. ही माहिती मिळताच प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांनी या 15 जणांचा शहरातील नाईकवाडपुरा, रेहमतनगर, बागवानपुरा येथून 13 जणांना तर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे एक असे 1 अशा 14 जणांना ताब्यात घेतले. तर संगमनेर शहरातील एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे.

संगमनेर शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीची प्रकृती ढासळल्याने व त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आल्याने डॉक्टरांनी आरोग्य विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर त्याच्यासह संपर्कात आलेल्या अन्य 14 जणांना पुढील उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांना देखील अन्य ठिकाणी विलगीकरण करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like