जोधपूरमध्ये बस आणि जीपचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जोधपूर तेथे झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रस्त्यावरून धावणाऱ्या एका बसचा टायर फुटून हि बस समोरून येणाऱ्या जीपवर आदळून हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

मागील दोन दिवसांत हा दुसरा मोठा अपघात असून जयपूरमध्ये परवा आणखी एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींची स्थिती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघात इतका भीषण होता कि, जीपचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. जखमींना जोधपुरच्या मथुरा दास माथुर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान,पोलीस घटनास्थळी असून या अपघाताला कोण जबाबदार आहे, याचा तपास केला जात आहे. सध्या मृतदेहांना हलवण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले असून वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात येणार आहेत.

Loading...
You might also like