मेगा भर्ती पार्ट – 2 : महाडीक, गोरे, राणाजगजितसिंह यांचा अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाची महाजनादेश यात्रा आज सोलापूरमध्ये दाखल झाली आहे. सोलापूरमध्ये आज भाजपकडून सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आघाडीतले दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह हे भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसेच कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, साताऱ्याचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील वजनदार व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. पद्मसिंह पाटील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पद्मसिंह पाटील यांचे पवार घराण्याशी नात्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादीच्या जडणघडणीत पद्मसिंह यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पक्ष सोडण्याने सर्वात मोठा धक्का शरद पवारांना बसणार आहे. त्याची झलक श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत दिसून आली.

आरोग्यविषयक वृत्त –