मशिदीत गोळीबार ; ४० जणांचा मृत्यू, २० गंभीर जखमी

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – न्यूझीलंडमध्ये मशिदीत करण्यात आलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले असल्याचे न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी ट्विटकरुन दिली आहे. ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले होते. यानंतर त्यांनी आणखी एका मशिदीत गोळीबार केला.

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरुष एका महिलेचा समावेश आहे. ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली असून ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस प्रमुख माईक बुश यांनी दिली.

पोलिसांनी ख्राईस्टचर्च येथे गंभीर परिस्थिती निर्माण झालं असल्याचं आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मशिद अल नूर येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम जमलेले होते. यामध्ये बांगलादेश क्रिकेट संघदेखील होता. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू सुरक्षित आहेत.

एका साक्षीदाराने stuff.co.nz ला दिलेल्या माहितीनुसार आपण प्रार्थना करत असताना गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. बाहेर येऊन पाहिलं असता आपली पत्नी रस्त्यावर मृत्यूमुखी पडलेली होती. दुसऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलांवर गोळीबार होताना पाहिल्याचं सांगितलं. माझ्या आजुबाजूला सगळीकडे मृतदेह होते असंही त्यांनी सांगितलं.

बांगलादेश क्रिकेट संघाच्या प्रवक्त्याने संपूर्ण संघ सुरक्षित असून त्यांना मानसिक धक्क्यात असल्याची माहिती दिली आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगण्यात आलं आहे.

न्यूझीलंड पोलिसांच्या माहितीनुसार, क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे एक शूटर उपस्थित आहे. पोलीस त्याचा सामना करत आहेत. परंतु अद्याप या गोळीबारात किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिलेली नाही. सेंट्रल क्राइस्टचर्चच्या प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, मशिदीत ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा तिथे अनेक जण उपस्थित होते. तर शेजारी असलेल्या दुसरी मशिदी रिकामी करण्यात आली आहे.

ह्याही बातम्या वाचा-

धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’ 

कोंढव्यातील प्लॉस्टिकच्या गोडावूनला भीषण आग ; गोडावूनसह १ रिक्षा, १ स्कुलव्हॅन भस्मसात 

‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

You might also like