कामाच्या गोष्टी ! 1 जुलैपासून बदलतील बँकिंग, LPG, टॅक्ससह अनेक नियम, इथं वाचा संपुर्ण अपडेट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बँकिंग (Banking), इन्कम टॅक्स (Income Tax), टीडीएस (TDS), ड्रायव्हिंग लायसन्ससह (Driving Licence) रोजच्या गरजांशी संबंधीत अनेक नियम उद्या म्हणजे 1 जुलै (1 july ) पासून बदलणार आहेत. या बदलांबाबत माहित नसेल तर अचानक तुम्ही गोंधळून जाऊ शकता यासाठी हे सर्व नियम आणि संभाव्य बदल जाणून घेवूयात…Many rules including banking, LPG, tax will change from July 1, read the full update here

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

SBI च्या ग्राहकांनी लक्ष द्यावे

एसबीआय ग्राहकां (sbi customer) ना 1 जुलैपासून कॅश काढणे महाग पडणार आहे. 1 जुलैपासून महिन्यात बँकेतून 4 वेळेपेक्षा जास्त पैसे काढल्यास जास्त चार्ज द्यावा लागेल. यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याचाही समावेश आहे.

SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शियल वर्षात 10 चेकची कॉपी दिली जाते. आता 10 चेकच्या चेकबुकवर ग्राहकांना शुल्क द्यावे लागेल. आता BSBD बँक खातेधारकांना 10 चेक लीवसाठी 40 रुपयांसह GST चार्ज द्यावा लागेल, तर 25 चेक लीवसाठी 75 रुपये आणि जीएसटी चार्ज द्यावा लागेल. इमर्जन्सी चेकबुकच्या 10 लीव साठी 50 रुपये प्लस जीएसटी द्यावा लागेल.

नवीन IFSC कोडचा करावा लागेल वापर

सिंडिकेट बँक ग्राहकां (syndicate bank customers ) साठी अतिशय महत्वाची बातमी आहे. सिंडिकेट बँकेचे एक एप्रिल 2020 पासून कॅनरा बँके (Canara Bank) त विलीनीकरण झाले आहे. यासाठी आता 1 जुलैपासून बँकेचा आयएफएससी कोड (Canara Bank Ifsc code) बदलणार आहेत. अशावेळी सिंडिकेट बँकेच्या शाखांचे सध्याचे आयएफएससी कोड 30 जून 2021 पर्यंत काम करतील. नंतर नवीन कोड लागू होतील.

बँक ऑफ बडोदामध्ये असेल अकाऊंट तर.. (Bank of Baroda)

विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँके (Dena Bank) चे सुद्धा विलिनिकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले आहे. अशावेळी जुन्या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना आयएफएससी ( Vijaya Bank Ifsc code/Dena Bank Ifsc code) कोड अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. जुना आयएफएससी कोड 1 जुलैपासून डिस्कंटीन्यू होईल. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) च्या वेबसाइटवर नवीन कोड टाकले जातील. तेथून जाणून घेवू शकता.

TDS आणि TCS जास्त कापणार

नवीन अर्थ कायदा 2021 लागू झाल्यानंतर टीडीएस (TDS ) च्या नियमात बदल 1 जुलै 2021 पासून लागू होतील. या अंतर्गत मागील 2 वर्षांसाठी आयटीआर दाखल केलेला नसल्यास आणि प्रत्येक वर्षी कापला गेलेला टीडीएस 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास दुप्पट टीडीएस द्यावा लागेल. म्हणजेच मागील आर्थिक वर्षात टीडीएस 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तरी सुद्धा टीडीएस कपात 5 टक्केच्या दराने होईल.

या बँकांच्या ग्राहकांना बदलावे लागेल चेकबुक (Checkbook) 

आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकांच्या मर्जरनंतर युनियन बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना नवीन सिक्युरिटी फिचर्सचे चेक वापरण्यास सांगितले आहे.
1 जुलै 2021 पासून सर्व जुने चेक इनव्हॅलिड हातील.
आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनिकरण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झाले आहे आणि मर्जरनंतर दोन्ही बँकांचे आयएफएससी सुद्धा बदलतील.

LPG सिलेंडरच्या दरात बदल शक्य (LPG cylinder price)

1 जुलैला LPG सिलेंडर म्हणजे स्वयंपाकाच्या गॅवच्या नवीन किमती जारी होतील. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑईल कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती ठरवतात.
जुलैमध्ये घरगुती आणि कमर्शियल गॅसच्या किमती किती वाढणार हे पहावे लागेल.

स्मॉल सेव्हिंगज स्कीम्सच्या दरात बदल

पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स, सुकन्या समृद्धी सारख्या छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात सरकार कपात करू शकते. दर तीन महिन्यांनी या दरांमध्ये बदल होतो.

मोटरसायकल आणि स्कूटर्स महागणार

प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्मिती कंपनी कंपनी हिरो मोटोकॉर्पने 1 जुलैपासून सर्व रेंजच्या मोटरसायल आणि स्कूटर्सच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
वेगवेगळे मॉडल्स आणि व्हेरिएंटच्या या दुचाकी वाहनांच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. मार्चमध्ये सुद्धा कंपनीने 2,500 रुपयांची वाढ केली होती.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Many rules including banking, LPG, tax will change from July 1,
read the full update here

 

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर