एल्गार परिषदेला माओवाद्यांचा पैसा वापरला : सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन

एल्गार परिषद आणि भिमा कोरेगाव प्रकरणी काल पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे माओवादीशी संबंधित सबळ पुरावे सापडले आहे. एल्गार परिषदेला त्यांचा पैसा वापरण्यात आला आहे. अटक झालेले सर्व माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे. अशी माहिती पुणे पोलीस सह आयुक्त रवींद्र कदम यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रवीण मुंडे हे देखील उपस्थित होते. यावेळी रवींद्र कदम म्हणाले की,पुणे पोलिसांनी काल नागपुरातून वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन यांना अटक करण्यात आली आहे. तर माओवाद्यांचा नेता रोना विल्सन याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.यातील कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंगला आज सकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असून 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिलिंद तेलतुंबडे यांनी रोना विल्सन यांना जानेवारी महिन्यात पत्र पाठवले होते.त्यांच्या हार्ड डिस्कमधून एक पत्र मिळाले आहे.यामध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांच्या नावाचा आणि प्रकाश आबेंडकर च्या नावाचा समावेश त्या पत्रात समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.