माओवाद्यांनी केले पोलीस उपनिरीक्षकाचे अपहरण

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकांचे माओवाद्यांनी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे बिजापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुरली ताती असे अपहरण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

जगदलपूर येथे नियुक्तीवर असलेले मुरली ताती हे सुट्टीवर बिजापूर जिल्ह्यातील गंगलुरला आपल्या गावी आले होते. पालनारच्या आठवडी बाजारात खरेदी करण्यासाठी ते गेले होते. या वेळी बाजारातून माओवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. बुधवारी सायंकाळपासून ताती यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे सुरक्षा दलात खळबळ उडाली आहे.

बिजापूर जिल्ह्यात माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये ३ एप्रिलमध्ये मोठी चकमक उडाली होती. त्यावेळी माओवाद्यांनी जवान राकेश्वर सिंह यांचे अपहरण केले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची सुटका केली होती.