सकारात्मक निर्णय घ्या… अन्यथा मराठा समाजाकडून राज्य सरकारला २४ तासांचा ‘अल्टीमेटम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये मराठा समाजाला यंदा आरक्षण नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतर याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत राज्य सरकारला दणका दिला होता. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत सरकारने २४ तासात सकारात्मक निर्णय घ्यावा असा अल्टीमेटम आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिला आहे.

अन्यथा विधानसभेत दणका देऊ
उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटील यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांची बाजू ज्येष्ठ वकील पटवालिया आणि अ‍ॅड. संदिप देशमुख यांनी मांडली होती. त्यावेळी न्यायालयाने निर्णय देताना याला सर्वस्वी सरकारला जबाबदार ठरवत धारेवर धरले होते. तर आरक्षणासाठी आमच्या ५० तरुणांचा वळी गेला आहे. आम्ही सरकारला वारंवार सागत होतो की कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्या. मात्र ते न्यायालयात टिकलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. मराठा समाजाने लोकसभा निवडणूकीत कसलीही भूमिका घेतली नाही. मात्र वैद्यकिय विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन सरकारने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा विधानसभा निवडणूकीत भाजपविरोधात निर्णय घेऊ असं खुलं आव्हान विनोद पाटील यांनी राज्य सरकारला दिलं आहे.