मंत्रिमंडळात आव्वाज ‘एक मराठा, लाख मराठा’ ! ‘एवढे’ मंत्री मराठा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महाविकास आघाडीच्या ३६ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले आहे. विशेष म्हणजे मराठा समाजातील ५० टक्क्यांहून अधिक नेत्यांना मंत्रिपद मिळालं आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात तब्बल २३ मंत्री हे मराठा समाजातील आहेत.

मागे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवाजी पार्कवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आमदारांनी शपथ घेतली होती. त्यानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन देखील झाले. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून आज सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राजभवनामध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात एकूण ३६ मंत्र्यांना शपथ दिली.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात मराठा मंत्र्यांचे वर्चस्व पाहायला मिळाले असून ३६ मंत्र्यांपैकी तब्बल २३ मंत्री हे मराठा समाजाचे आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. कारण मराठा समाजाचे वर्चस्व हे भाजपाच्या काळात कमी होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा काळ लक्षात घेतला तर त्यांच्या काळात देखील मराठा समाजाचे वर्चस्व पहायला मिळाले आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात २३ मंत्री हे मराठा समाजातील आहेत तर ४ मंत्री मुस्लिम समाजातील, ४ ओबीसी वर्गातील, ३ नवबौद्ध समाजातील आणि १ आदिवासी वर्गातील आहेत. विशेष म्हणजे महिला मंत्र्यांची संख्या ही फार कमी असून मंत्रिमंडळात महिलांची संख्या फक्त ३ आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/