मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने लढा द्यावा : रामदास आठवले 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन 

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.त्याला हिंसक स्वरूप मिळाले असून शांततेच्या मार्गाने लढा उभारावा. असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना. ते बोलत होते.

[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e285d93d-9538-11e8-8ce5-35e38817b7de’]

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे. तसेच राज्य सरकारकडून 16 टक्के आरक्षणाची मागणी न्यायालयामध्ये किती पत टिकेल हे सांगता येणार नाही. हे लक्षात घेता इतर राज्यामध्ये देखील आरक्षणाचा प्रश्न आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत आरक्षण कसे बसवता येईल. त्यासाठी संसदेचे खास अधिवेशन बोलवून कायदा करावा लागेल. या आरक्षणाला  सर्व पक्षाचा पाठींबा लागणार आहे. तसेच या आंदोलनापूर्वी एनडीएच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुदा मी प्रामुख्याने उपस्थित केला होता. तसेच ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता. योग्य आरक्षण कसे देता येईल. यासाठी प्रयत्न सुरू असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

वांद्रे पूर्व मधून आगामी निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ते म्हणाले की, आरपीआय ला राज्यात चांगले वातावरण असून मी मागील निवडणुककीचा अंदाज लक्षात घेता. मुंबईमधून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.