तोडफोडीची नुकसान भरपाई देणार : समन्वयक, मराठा क्रांती मुक मोर्चा

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन
मराठा असमाजाच्या वतीने दिनांक ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती . या दरम्यान पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आली . त्यावर आज मराठा मोर्चा समन्वयकांनी पत्रकार परिषद घेतली . यादरम्यान , कार्यालयाच्या तोडफोडीची नुकसान भरपाई आम्ही देऊ अशी घोषना केली . मात्र मराठा आंदोलनात घुसलेल्या बाह्यशक्तीने हे कृत्य केले आहे. ही नुकसान भरपाई ही केवळ आमची नैतिक जबाब दारी म्हणून आम्ही देत आहोत . असे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी स्पष्ट केले.

याबरोबरच, मराठा आंदोलनात झालेल्या हिंसेचा आम्ही निषेध करतो. ज्या सामान्य नागरिकांना, पत्रकारांना काल त्रास झाला, त्यांची दिलगिरी व्यक्त करत असल्याचं मराठा समन्वयक म्हणाले.मराठा आंदोलनात काही बाह्यशक्ती म्हणजेच समाजकंटक घुसले होते, जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी तोडफोड केली. मराठा समाजातील बांधवांनी हिंसेचा अवलंब केला नसून विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही समितीने केला.

 [amazon_link asins=’B07B7PTPB2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a49a9f6f-9c9f-11e8-af9e-e945f7915846′]
१५ ऑगस्ट पासून अन्नत्याग आंदोलन
यापुढे आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत तालुका स्तरावर साखळी उपोषण करणार, 15 ऑगस्टपासून चूलबंद करुन अन्नत्याग आंदोलन करणार, अशी माहितीही मराठा समन्वय समितीने पत्रकार परिषदेत दिली.आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, परप्रांतीय कामगारांनी असुविधांचा असंतोष कालच्या मराठा मोर्चात व्यक्त केला.त्यामुळे शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घ्या, अशी मागणीही मराठा समन्वयकांनी राज्य सरकारकडे केली आहे. मराठा मोर्चाचे स्वयंसेवक समाजकंटकांना पकडून देतील, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली.
आम्ही सर्वांना पोटतिडकीने शांततेचं आवाहन करत होतो, मात्र दुपारनंतर तोडफोड झाली. तोडफोड करणारे कोण हे पोलिस तपासात समोर येईल, झाल्या प्रकाराबद्दल पुणे मराठा मोर्चा माफी मागतो, असंही समन्वयकांनी सांगितलं.
[amazon_link asins=’B01D2IBDE8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b366025f-9c9f-11e8-916e-33b6889fefd7′]