मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात मराठा आरक्षणावरून अनेक आंदोलने झाली. मुक मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजाने आक्रमक होत क्रांती मोर्चाला सुरुवात केली. या क्रांती मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वरील गुन्हे मागे घेण्याबाबत अनेकदा मागण्या केल्या गेल्या. त्यावर आता यावर प्रक्रिया सुरु होत आहे, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. केसरकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आपले निर्णय सांगत आश्वासन दिले.

मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, असं केसरकर यांनी म्हटलं. यापूर्वी मोर्चेकऱ्यावंर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी होत होती. पोलीसांवरील हल्ले आणि तत्सम गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दिली होती. तेव्हा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली होती.

मोर्चेकऱ्यांवरील मागे घ्यावयाच्या गुन्ह्यांबाबत पोलीस महासंचलाकडून अहवाल प्राप्त झाला आहे. तो अहवाल आथा विधी आणि न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. येत्या आठ-दहा दिवसांत पहिल्या टप्प्यातील अभिप्राय मिळाल्यानंतर उपसमितीची पुन्हा बैठक घेतली जाईल. त्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, असं केसरकर यांनी सांगितलं. तसंच अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.

सिने जगत –

मलाइका-अर्जुन यांच्या नात्याबद्दल अरबाज खानने दिले मिडियाला ‘हे’ उत्तर

तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच ‘ठरलं’ ; ‘या’ उद्योगपतीसोबत करणार विवाह

#video : …म्हणून वैवाहिक जीवनात अभिनेता शाहिद कपूर आहे ‘सुखी’

‘या’ अभिनेत्याच लग्न होत, त्याच दिवशी वडिलांचं झालं होतं निधन

You might also like