मराठा क्रांती मोर्चाः वाळूज एमआयडीसी तोडफोड केल्याप्रकरणी ४१ जणांना अटक 

आैरंगाबादः पोलीसनामा आॅनलाईन-

9 आॅगस्ट रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यावेळी शांततेत चाललेल्या आंदोलनाला अचानक शहरात हिंसक वळण लागले. यामध्ये आंदोलकांनी आक्रमक होत वाळूज एमआयडीसीमध्ये मोठी तोडफोड केली होती. आता याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी 41 जणांना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. आैरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसीमध्ये बंद असलेल्या कंपन्यांची तोडफोड करण्यात आली होती.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b9d3bfe0-9d65-11e8-8d69-5dd83f48f175′]

या तोडफोडीमध्ये औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीतील ६० कंपन्यांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र बंद संपण्याच्या वेळी तोडफोड झाली. या सगळ्या प्रकारावर उद्योजक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आंदोलकांनी कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड केली. तर वोक्हार्ड कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळही काही आंदोलकांनी गोंधळ घातला. या तोडफोडीत एमआयडीसीच्या ६० मोठ्या कंपन्यांचे नुकसान झाले आहे आता पोलिसांनी याप्रकरणी ४१ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर मराठा मोर्चा समन्वय समितीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत औरंगाबाद तोडफोडीत बाह्य शक्तींचा हात होता यामध्ये आंदोलक नव्हते त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.