…तर मुख्यमंत्र्यांना बाहेर पडू देणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन असून क्रांती दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय झाला नाही तर सरकारच्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. मुख्यमंत्र्यंच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलनाला बसू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाहेर पडू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी वापर करू नका. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांना नोकरीच्या आश्वासनांची सरकारने अंमलबजावणी करायला पाहिजे. उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनी 30 तारखेला 42 आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी भेटीसाठी बोलावलं आहे. मात्र, आता आम्ही बैठकांना जाणार नसल्याचा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

काय घडलं कोर्टात ?
सुप्रीम कोर्टात क्रमांक एकची केस दिसल्यानंतर देखील तांत्रिक कारणामुळे सुनावणी उशिराने सुरु झाली. सुनावणी सुरु होताच महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद करणे कठीण आहे. यावर कोर्टाने आपल्या म्हणण्याचा निश्चित विचार करु असे म्हटले.

दरम्यान, आता हे प्रकरण 11 न्यायधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. या मागील कॅप्सचे आरक्षण 50 टक्के आहे. न्यायालयाने 25 ऑगस्ट 2020 रोजी या अर्जावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण याचिकेवर परत येत असताना न्यायालयाने हे प्रकरण 1 सप्टेंबर 2020 पर्यंत तहकूब केले आहे.