मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा क्रांती मोर्चा तसेच किसान क्रांतीचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर यांचे मंगळवारी पहाटे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना त्रास होत असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. आज पहाटे त्यांना ह्दयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले.

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणारा नेता म्हणून शांताराम कुंजीर हे ओळखले जात होते. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे काम केले होते. खेड्या पाड्यात पसरलेल्या शेतकरी मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी जीवनभर प्रयत्न केले. मराठा क्रांती मोर्चाचे ते पुण्याचे समन्वयक म्हणून काम करत होते.

त्यांना पॉडिलासिसचा त्रास होता़ हा त्रास वाढल्याने त्यांना जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले.