Maratha Kranti Morcha | चंद्रकांत पाटलांची मराठा आरक्षण उपसमितीवरून हकालपट्टी करा, मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत ठराव

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) जालना जिल्ह्याच्या वतीने मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी लढणाऱ्या राज्यातील विविध संघटना, अभ्यसाक आणि सामान्य कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे (Round Table Conference) रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांची मराठा आरक्षण उपसमितीवरुन हकालपट्टी करावी यासह 15 ठराव घेण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) आयोजित केलेली ही बैठक सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालली.

 

चंद्रकांत पाटलांनी फक्त आश्वासने दिली
मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या (Maratha Kranti Morcha) वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोलमेज परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. गेल्यावेळीच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष (Maratha Reservation Sub-Committee) होते. त्या वेळी देखील त्यांनी आश्वासन देण्याशिवाय काहीच केले नाही. तसेच त्यांनी मराठा समन्वयाकामध्ये वाद लावण्याचे काम केले. आत्ताही तेच उपसमितीचे अध्यक्ष असून त्यांच्याकडून बैठका घेतल्या जात नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव रविवारी सर्वांच्या मते घेण्यात आल्याची माहिती समन्वयकांनी दिली.

मराठा आरक्षण गोलमेज परिषदेतील ठराव
– यापुढे मराठवाड्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचा कुठेही कार्यक्रम होत असल्यास, त्याचा सदनशीर मार्गाने विरोध करुन कार्यक्रम उधळून लावण्यात यावा.

– राज्यपालांना राज्यपाल पदावरून हटवावे.

– सर्वोच्च न्यायालयासमोरील (Supreme Court) मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्रुटी दूर करुन आवश्यक पद्धतीने सरकार दरबारी प्रयत्न करुन ही याचिका सकारात्मक पद्धतीने निकाली काढावी.

– छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj),
महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule), सावित्रीबाई फुले (Savitribai Phule),
कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचा अपमान करणाऱ्यांवर करडक करावाई केली जावी.

– भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीवरुन हकालपट्टी करावी.
त्यांनी मराठा समन्वयकामध्ये वाद लावण्याचे काम केले असून गेल्या चार महिन्यात एकही बैठक घेतलेली नाही.

– राज्यात जात निहाय जनगणना करावी.

– राज्यपाल ज्या ठिकाणी जातील तिथे बंद पाळला जाईल…

 

Web Title :- Maratha Kranti Morcha | disrupt the governor bhagat singh koshyari programs in marathwada resolution in maratha reservation round table conference

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar | अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं, म्हणाले – ‘लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का?’

Lady Police Constable Suicide | धक्कादायक! नाईट ड्युटीवरुन येताच महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या