विष प्यायलेल्या ‘त्या’ आंदोलकाचा मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात एका आंदोलकाने गोदावरी नदी पात्रात उडी मारून जीव दिला. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन आणखीनच भडकले आहे. काल जगन्नाथ सोनावणे या ५५ वर्षीय व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला जवळच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आंदोलनातील हा दुसरा बळी असून त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर व रायगड बंदची हाक दिली होती. हे आंदोलन सुरू असतानाच सोनवणे यांचा आज मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जवळच्या शेतामध्ये जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे (वय ५५) यांनी विष प्राशन केले होते. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली होती. त्याला १०८ रुग्णवाहिकेने घाटी येथील रुग्नालयात दाखल करण्यात आले होते. जगन्नाथ यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर मेडिसिन विभागातील एमआयसीयुत उपचार सुरू होते. त्यांनी प्राशन केलेले विष डायल्यूटेड नसल्यामुळे त्यांच्या शरीरात विष तात्काळ पसरले. त्यामुळे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजता उत्तरीय तपासणी नंतर जगन्नाथ यांचे पार्थिव देवगाव रंगारी येथे दहा वाजता रवाना करण्यात आले. देवगांव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांना दोन एकर शेती आहे त्यांच्या लहान मुलगा भगवान सोबत ते शेती करतात. तर मोठा मुलगा भारत हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात तलाठी आहे.

[amazon_link asins=’B0784SX2SP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’600ba538-8fd2-11e8-b500-0d291a8add77′]

आज मुंबई बंद….

मराठा क्रांती मोर्चाचा आजचा मुंबईत बंद शांततेत सुरु असून ठाण्यात मात्र त्याला हिंसक वळण लागले आहे. वागळे इस्टेट येथे टीएमटी बसची तोडफोड करण्यात आली. मुंबईमध्ये आतापर्यंत बेस्ट बससेवा सुरळीत आहे. नवी मुंबई येथील घणसोलीमध्ये पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशी पर्यंत बेस्टची बस सेवा बंद आहे. मुंबईतील लोकल सेवा नेहमीप्रमाणे सुरु असली तरी प्रवाशांच्या गर्दीवर परिणाम झाला आहे.

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोचार्ने बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवांसह शाळा-महाविद्यालये आणि स्कूलबस, दूध- भाजीपाला वगळण्यात आले असून बंददरम्यान कोणतीही हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“मुंबईत बंद शांततेत, ठाण्यात टीएमटी बसची तोडफोड”