मराठा मोर्चात आणखी एका आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाजाचे आंदोलन चांगलेच धुमसत आहे. बंदला जरी स्थगित झाला असला तरी आजही जागोजागी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनात नांदेड येथे पुन्हा एका मराठा आंदोलकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता तरुणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पुर्णा तालुक्यातील नांदेडमध्ये पुन्हा एका मराठा आंदोलकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आहेलेगाव सवराते येथील घटना आहे. प्रशांत सवराते असे तरुणाचे नाव आहे. त्याने मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर प्रशांत यांना तात्काळ नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B079T5L898′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e90d8ac-90cd-11e8-ac15-8f815d3067c8′]

या प्रकरणात सर्वात आधी औरंगाबादेतील कायगाव येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्यानंतर गुड्डू सोनावणे आणि जगन्नाथ सोनावणे यांनी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला यात जगन्नाथ सोनावणे यांना आपला जीव गमवावा लागला. आता आज पुन्हा नांदेड येथे एका आंदोलकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.