मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस नगरमधून प्रारंभ

अहमदनगर : पोलीसनामा पोलीसनामा – मराठा क्रांती मोर्चा आंदोलन मोडून काढण्यासाठी सत्ताधारी व काही राजकारणी भाडोत्री प्यादे पुढे करीत आहेत. समाजातील संभ्रम दूर करणे, जागृती करणे, मराठा तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करून निर्णायक व व्यापक आंदोलनाची तयारी करण्याच्या उद्देशाने विभागनिहाय मराठा संवाद यात्रा २६ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर आयोजित केली जाणार आहे. नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नाशिक विभागीय संवाद यात्रेस प्रारंभ करण्यात आला.

पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गींच्या हत्येचा ‘तो’च प्लॅनर 

पारनेर, श्रीगोंदा, कोपर्डी, कर्जत, जामखेड, आष्टी, कडा मार्ग पाथर्डीला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, बाभळेश्वर, राहता, शिर्डी, कोपरगाव, येसगाव मार्गे येवला येथे ही यात्रा जाणार आहे. येवला येथून २६नोव्हेंबर रोजी विधानमंडळावर हि यात्रा धडकणार आहे. या यात्रेत यावेळी संजीव भोर, विजय म्हस्के, नवनाथ वायाळ, राम झिने, प्रमोद भासार, मयूर वांढेकर, राजेंद्र कर्डिले, विशाल म्हस्के, संदीप सायंबर, संदीप वाघ, गोरख आढाव, शुभम माने, प्रमोद घोरपडे, संदीप संसारे, सुरेखा सांगळे, मच्छद्रिंनाथ म्हस्के, राजाभाऊ वराट, अण्णा काळे , नितीन ढाळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाला म्हणजे आरक्षण मिळाले असे नव्हे, जोपर्यंत समाजाला आरक्षणाच्या निर्णयाचे प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, मराठा आरक्षणाला कायदेशीर अडथळे येणार नाहीत, याची सरकारने किती काळजी घेतली आहे. याची खातरजमा होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळाले असे म्हणता येणार नाही. आरक्षणाबरोबरच मराठा क्रांती मोर्चाद्वारे ज्या २० मागण्या सरकारकडे केलेल्या आहेत. त्याही महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आरक्षणासह सर्व मागण्यांना न्याय मिळाल्याशिवाय हटणार नसल्याचा निर्धार मराठा संवाद यात्रेत करण्यात आला आहे. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.