मराठा क्रांती मोर्चाचा पुन्हा एल्गार, ‘या’ तारखेला होणार बैठक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांनी एकत्रित येऊन राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा आरोप करत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे येत्या ६ मार्चला सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे.

राज्य सरकारने २९ नोव्हेंबर २०१८ ला मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्व शासकीय विभागांना मराठा आरक्षणातून नियुक्ती देऊ नका, असे आदेश राज्य शासनाने स्वत:हूनच दिले आहेत. या छुप्या आदेशाद्वारे सरकारने कुटनीतीने मराठा समाजाची मोठी फसवणूक केली आहे. असा आरोप करत, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे येत्या ६ मार्चला सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे.

इतकेच नव्हे तर, सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याचे संघटनेतील एका समन्वयकाने म्हंटले आहे. विशेष याचबरोबर, मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे आश्वासन दिल्यानंतरही मागे घेण्यात आले नाहीत. तसेच आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबालाही मदतअद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे या बैठकीत सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही  संघटनेतर्फे करण्यात आले आहे.